Join us  

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताचे वर्चस्व वाढणार; AMD करणार 32,88,64,02,800 रुपयांची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 10:21 PM

Semiconductor Manufacturing in India : गुजरातमध्ये शुक्रवारपासून वार्षिक सेमीकंडक्टर परिषद सुरू झाली आहे. यात AMD ने मोठी घोषणा केली.

नवी दिल्ली: सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भारत जगातील सर्वात महत्वाचे ठिकाण बनत आहे. अमेरिकेतील दिग्गज चिपमेकर Advanced Micro Devices(AMD) ने 2028 पर्यंत भारतात $400 मिलियन (रु. 32,88,64,02,800) गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. बंगळुरूच्या टेक हबमध्ये कंपनी त्यांचे सर्वात मोठे डिझाईन सेंटर स्थापन करेल. गुजरातमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या वार्षिक सेमीकंडक्टर परिषदेत कंपनीने ही माहिती दिली. फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ आणि मायक्रोनचे सीईओ संजय मेहरोत्रा ​​यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

भारत सरकार चिप उत्पादनावर भर देत आहे. मोदी सरकार भारताला चिप हब बनवण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. AMD ने सांगितले की ते या वर्षाच्या अखेरीस बंगळुरूमध्ये त्यांचे नवीन डिझाइन सेंटर कॅम्पस उघडतील. कंपनी येत्या पाच वर्षांत 3000 नवीन नोकऱ्या निर्माण करेल.

5 लाख चौरस फूट परिसरात 10 ठिकाणी AMD च्या कार्यालयाचा विस्तार होईल. कंपनीचे देशात आधीच 6,500 कर्मचारी आहेत. AMD च्या चिप्स पर्सनल कॉम्प्युटर्सपासून ते डेटा सेंटरपर्यंत विविध उपकरणांमध्ये वापरल्या जातात. AMD त्यांच्या चिप्सचे उत्पादन आउटसोर्स करते. चिप्सचे डिझाईन तैवानच्या TSMC सारख्या थर्ड पार्टी मॅन्यूफॅक्चररकडे केली जाते.

TSMC आणि दक्षिण कोरियातील सॅमसंग हे जागतिक स्तरावरील काही मोठ्या चिप निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी अत्याधुनिक चिप बनवण्यात महारत मिळवली आहे. कोरोना महामारीच्या काळात चिपची खूप कमतरता होती. तेव्हापासून अनेक देश आता पुरवठा साखळी समस्या टाळण्यासाठी स्वतः चिप्स तयार करू इच्छित आहेत.

2021 मध्ये भारताने चिप क्षेत्रासाठी 10 अब्ज डॉलरचा प्रोत्साहन कार्यक्रम सुरू केला. परंतु अद्याप एकाही कंपनीला उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता मिळू न शकल्याने हा कार्यक्रम रखडला आहे. पण, आता लवकरच या क्षेत्रात नवनवीन कंपन्या येण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारत मोठा चिप निर्माता म्हणून उदयास येईल. 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकभारतअमेरिका