fixed deposits highest rates : शेअर मार्केटमध्ये जोखीम जास्त असल्याने ज्येष्ठांसाठी बँकेत मुदत ठेव (FD) हाच चांगला पर्याय समजला जातो. एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा ०.२५% ते ०.५०% जास्त व्याज दिले जाते. तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला मुदत ठेव करायची असेल, तर सध्या अनेक खासगी बँका अतिशय आकर्षक व्याजदर देत आहेत. अनेक लोक आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर मुदत ठेव बँकेत ठेवतात. त्यांनाही ही चांगली संधी आहे.
बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.५५% पर्यंत व्याजदर देते. यामध्ये १ वर्षासाठी ८.५५%, ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी अनुक्रमे ७.७५% आणि ६.६०% व्याजदराने FD करता येते.
डीसीबी बँक देखील मुदत ठेवीवर ज्येष्ठांसाठी ८.५५ टक्के व्याजदर देते. या बँकेत १ वर्षासाठी FD केल्यास तुम्हाला ७.६०% व्याज मिळेल, तर ३ वर्षांसाठी तुम्हाला ८.०५% व्याजदर मिळेल आणि ५ वर्षांसाठी तुम्हाला ७.९०% व्याजदर देत आहे.
एसबीएम बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.७५% च्या कमाल व्याज दराने FD ऑफर करत आहे. या बँकेत १ वर्षासाठी ७.५५%, ३ वर्षांसाठी ७.८०% आणि ५ वर्षांसाठी ८.२५% व्याज असेल.
आरबीएल बँकेतही ज्येष्ठ नागरिकांना कमाल ८.६०% व्याजदर दिला जातो. पैसाबाजार नुसार, जर तुम्ही या बँकेत १ वर्ष आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी FD केली तर व्याज दर ८.००% आहे, तर ५ वर्षांसाठी व्याज दर ७.६०% आहे.
इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल ८.२५% व्याजदर देत आहे. १ वर्षाच्या कालावधीसाठी देखील हा व्याजदर लागू आहे, तर ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या FD वर ७.७५% व्याज उपलब्ध आहे.
तुम्ही येस बँकेत जास्तीत जास्त ८.२५% व्याजदराने एफडी करू शकता. १ वर्षाचा व्याज दर ७.७५% आहे, तर ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या FD वर ८% व्याजदर दिला जात आहे.
तामिळनाडू मर्कंटाइल बँक ही खाजगी क्षेत्रातील बँक जास्तीत जास्त ८.२५% दराने एफडी देत आहे. यामध्ये १ वर्षाच्या FD वर ७.५०% व्याज दिले जात आहे. ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी दर ७% आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त ८.२५% व्याजदर देते. १ वर्षाच्या कालावधीसाठी दर ७.००% आहे, तर ३ वर्षे आणि ५ वर्षांसाठी अनुक्रमे ७.३०% आणि ७.२५% व्याजदर आहेत.