Lokmat Money >गुंतवणूक > Sensex Stock Market : एप्रिलनंतर पहिल्यांदा निफ्टी १८ हजारांवर बंद, शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४५६ अंकांची वाढ

Sensex Stock Market : एप्रिलनंतर पहिल्यांदा निफ्टी १८ हजारांवर बंद, शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४५६ अंकांची वाढ

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार 60,000 च्या वर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 08:08 PM2022-09-13T20:08:24+5:302022-09-13T20:10:17+5:30

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार 60,000 च्या वर बंद झाला.

Sensex Stock Market For the first time since April Nifty closed at 18 thousand the stock market index increased by 456 points investment rupees dollar | Sensex Stock Market : एप्रिलनंतर पहिल्यांदा निफ्टी १८ हजारांवर बंद, शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४५६ अंकांची वाढ

Sensex Stock Market : एप्रिलनंतर पहिल्यांदा निफ्टी १८ हजारांवर बंद, शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४५६ अंकांची वाढ

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार 60,000 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या सलग चौथ्या दिवशी बाजाराच्या निर्देशांकात वाढ दिसून आली. या वर्षी 4 एप्रिलनंतर निफ्टीही प्रथमच 18 हजारांच्या वर बंद झाला आहे. यापूर्वी 4 एप्रिल रोजी हा निर्देशांक 18,053 च्या पातळीवर बंद झाला होता. तर दुसरीकडे शेअर बाजाराचा निर्देशांक आज 456 अंकांनी वाढून 60,571 वर बंद झाला.

शेअर बाजारातील मुख्य 30 शेअर्सपैकी 24 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 60,635 उच्चांकी आणि 60,381 नीचांकी पातळी गाठली. निफ्टीमध्येबी 133 अंकांनी किंवा 0.75 टक्क्यांनी वाढ होऊन तो 18,070 वर बंद झाला आणि त्यातील 34 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि टायटनच्या शेअर्समध्ये वाढ दिसून झाली.

रूपया 79 वर
जगातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे अवमूल्यन आणि परकीय निधीचा ओघ वाढल्याने इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये रुपया मंगळवारी ३६ पैशांनी वाढून ७९.१७ (तात्पुरती) प्रति डॉलरवर बंद झाला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 79.30 वर उघडला. दिवसाच्या व्यवहारात रुपयाने 79.03 ची उच्चांकी आणि 79.33 ची नीचांकी पातळी गाठली. अखेरिस तो डॉलरच्या तुलनेत 79.17 वर बंद झाला.

Web Title: Sensex Stock Market For the first time since April Nifty closed at 18 thousand the stock market index increased by 456 points investment rupees dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.