Lokmat Money >गुंतवणूक > कधीकाळी 170 रुपये होता भाव...आज एका शेअरची किंमत रु. 13000; तुमच्याकडे आहे का?

कधीकाळी 170 रुपये होता भाव...आज एका शेअरची किंमत रु. 13000; तुमच्याकडे आहे का?

शेअर बाजारात काही असे शेअर असतात, जे गुंतवणूकदारांना मालामाल करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:16 PM2024-04-23T22:16:42+5:302024-04-23T22:17:14+5:30

शेअर बाजारात काही असे शेअर असतात, जे गुंतवणूकदारांना मालामाल करतात.

Share Market :Once the price was 170 rupees...Today the price of one share is 13000; do you have it? | कधीकाळी 170 रुपये होता भाव...आज एका शेअरची किंमत रु. 13000; तुमच्याकडे आहे का?

कधीकाळी 170 रुपये होता भाव...आज एका शेअरची किंमत रु. 13000; तुमच्याकडे आहे का?

Share Market : शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची आहे, पण कधी-कधी असा शेअर हाती लागतो, जो गुंतवणूकदाराला मालामाल करतो. अशाच एका शेअरने गुंतवणूकदारांना काही वर्षात करोडपती केले आहे. काही वर्षांपूर्वी हा शेअर अवघ्या 173 रुपयांवर होता, परंतु आता त्याची किंमत तब्बल 13,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. आम्ही ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत, ती 'मारुती सुझुकी इंडिया' आहे. 

मारुती सुझुकीच्या शेअरने आज पहिल्यांदा 13000 रुपये प्रति शेअरची पातळी गाठली आहे. इंट्राडे दरम्यान मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढून 13,024.50 रुपयांवर पोहोचले. पण, नंतर बाजार बंद होईपर्यंत हे 1.65 टक्क्यांनी घसरुन 12,996.25 रुपयांवर बंद झाले. दरम्यान, आज कंपनीचे मार्केट कॅप 4 लाख कोटी रुपयांवर पोहचले.

शेअर एकेकाळी 170 रुपयांवर होता
11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकीचे शेअर्स केवळ 173.35 रुपयांवर व्यवहार करत होते, परंतु आज 13,000 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 21 वर्षात मारुती सुझुकीच्या स्टॉकने 7,384.86% परतावा दिला आहे. म्हणजेच, 2003 मध्ये एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअरमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला सुमारे 7.4 कोटी रुपये मिळतील.

भाव आणखी वाढणार ?
मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये ही वाढ 26 एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या तिमाही निकालापूर्वी झाली आहे. मोतीलाल ओसवाल म्हणाले की, प्रवासी वाहन विभागातील कंपनीच्या व्यवसायात वार्षिक आधारावर 19 टक्के आणि तिमाही आधारावर 20 टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत तिमाही निकाल आल्यानंतर मारुती सुझुकीचे शेअर्स आणखी वाढू शकतात.

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Share Market :Once the price was 170 rupees...Today the price of one share is 13000; do you have it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.