Lokmat Money >गुंतवणूक > इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:14 PM2023-06-29T13:14:48+5:302023-06-29T13:15:36+5:30

जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे.

Shares like Infosys TCS Wipro have made lost investors 2 years is now the right time to invest know what expert says | इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांतून निराशाजनक कामगिरी कमी केली आहे. जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे. आयटी निर्देशांकात विप्रो 30.11 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर ठरलाय. 27 जून 2023 रोजी विप्रोचे शेअर्स 382.60 रुपयांपर्यंत घसरले. हेच शेअर्स 28 जून 2021 रोजी 547.40 रुपयांवर होते. या आयटी निर्देशांकातील इतर शेअर्समध्ये इन्फोसिस (18.62 टक्क्यांची घसरण), एम्फसिस (10.25 टक्के) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस (4.18 टक्के) यांचा समावेश आहे.

TCS खरेदी करावा, विकावा की होल्ड करावा
बुधवारी टीसीएसचा शेअर 3215.45 रुपयांवर बंद झाला. एकूण 42 पैकी 19 विश्लेषकांनी त्यावर खरेदीची शिफारस केली आहे. तर, 14 जणांनी होल्ड आणि 9 तज्ज्ञांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिलाय.

विप्रो खरेदी करावा, विकावा की होल्ड करावा
शेअर बाजारात वाढ झाली असली तरी विप्रोचा शेअर घसरणीसह बंद झाला. शेअर 381.70 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तर 352 रुपये आहे. 40 पैकी फक्त 9 विश्लेषकांनी विप्रो वर बाय रेटिंग दिलेय. 15 जणांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे आणि 16 ने विक्रीचा सल्ला दिलाय.

इन्फोसिस खरेदी करावा, विकावा की होल्ड करावा
इन्फोसिसचा शेअर बुधवारी 1.11 टक्क्यांनी वाढून 1293.35 रुपयांवर बंद झाला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1672.60 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 1185.30 रुपये आहे. 42 पैकी 25 जणांनी या स्टॉकला बाय आणि स्ट्राँग बाय रेटिंग दिलंय. नऊ विश्लेषकांकडे होल्ड आणि 8 जणांनी विक्रीची शिफारस केलीये.

आयटी स्टॉक्सवर काय म्हणतात तज्ज्ञ?
“बदलत्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपमुळे अमेरिका, युरोप आणि भारतीय आयटी सेवा कंपन्यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये मंदी येत आहे. भारतीय आयटी कंपन्यांच्या कमाईच्या अंदाजात घट झाली आहे आणि गेल्या 12-15 महिन्यांत मूल्यांकन प्रीमियम दीर्घकालीन सरासरी मूल्यांकनाच्या पटीत सामान्य झाला आहे. कमाईच्या अंदाजात सतत होणारी घसरण नजीकच्या काळात खराब कामगिरी करत राहू शकते," असं बीएनपी परिबा शेअरखानचे भांडवली बाजार रणनिती प्रमुख, एसव्हिपी गौरव दुवा यांनी सांगितलं.

"मिडकॅप आयटी यांची कामगिरी अधिक चांगली दिसत आहे. परंतु उत्पादन, कॅपेक्स कंपन्या आणि बँकिंगसारखे चांगले पर्यायदेखील उपलब्ध आहे हे समजून घेणं आवश्क आहे," अशी प्रतिक्रिया नुवामा प्रोफेशनल क्लायंट ग्रुपचे संशोधन प्रमुख संदीप रैना यांनी दिली.

या स्टॉक्सनं केली कमाई
दुसरीकडे, निफ्टी आयटी निर्देशांकात पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या शेअर्सचा सर्वाधिक फायदा झाला. 27 जून 2023 रोजी स्टॉक 81 टक्क्यांनी वाढून 4,891.90 रुपयांवर आला. 28 जून 2021 रोजी हा स्टॉक 2,702.25 रुपयांवर होता. एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (33.40 टक्के), एलटीआय माइंडट्री (25.245 टक्के), एचसीएल टेक्नॉलॉजीज (18.75 टक्के), कोफोर्ज (13.90 टक्के) आणि टेक महिंद्रा (1.32 टक्के) यांनी जबरदस्त रिटर्न दिले आहे.

(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यातील तज्ज्ञांचे विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Shares like Infosys TCS Wipro have made lost investors 2 years is now the right time to invest know what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.