Lokmat Money >गुंतवणूक > 24 वर्षीय तरुणीने उभारली कोट्यवधींची कंपनी, आता 'शार्क' अमन गुप्ताने दिली मोठी ऑफर

24 वर्षीय तरुणीने उभारली कोट्यवधींची कंपनी, आता 'शार्क' अमन गुप्ताने दिली मोठी ऑफर

Shark Tank India Season 3: वयाच्या 20व्या वर्षी 2 हजार रुपयांत व्यवसाय सुरू केला अन् आज कोट्यवधींची उलाढाल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 04:30 PM2024-03-10T16:30:33+5:302024-03-10T16:32:10+5:30

Shark Tank India Season 3: वयाच्या 20व्या वर्षी 2 हजार रुपयांत व्यवसाय सुरू केला अन् आज कोट्यवधींची उलाढाल.

Shark Tank India-3: Started a business with 2000 rupees and built a company worth 10 crores, now Aman Gupta made a big offer | 24 वर्षीय तरुणीने उभारली कोट्यवधींची कंपनी, आता 'शार्क' अमन गुप्ताने दिली मोठी ऑफर

24 वर्षीय तरुणीने उभारली कोट्यवधींची कंपनी, आता 'शार्क' अमन गुप्ताने दिली मोठी ऑफर

Shark Tank India: शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरू आहे. अनेकजण या कार्यक्रमात आपल्या बिझनेस आयडिया घेऊन येत आहेत. दरम्यान, या शो-मध्ये एका 24 वर्षीय तरुणीला शॉर्क अमन गुप्ताकडून मोठी डील मिळाली आहे. अवघ्या 2000 रुपयांपासून सुरुवात करुन या तरुणीने आज 10 कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. 'द शेल हेअर' (The Shell Hair) असे तिच्या स्टार्टअपचे नाव आहे. 

कोण आहे तरुणी..?
राजस्थानमधील अजमेर येथे राहणारी 24 वर्षीय शेली बुलचंदानी (Shelly Bulchandani) एमएससी आयटीचे शिक्षण घेत आहे. तिला तिच्या कॉलेजकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे ती तिचा अभ्यास आणि व्यवसाय सहज सांभाळू शकते. तिने द शेल हेअर नावाचे स्टार्टअप सुरू केले, ज्यात हेअर एक्सटेंशन, विग, टॉपर्स, बँग्स आणि कलरफुल स्ट्रीक मिळतात. तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून शेलीने हे स्टार्टअप उभारले आहे.

2000 रुपयांपासून सुरू केला व्यवसाय
वयाच्या 20 व्या वर्षी शैलीने केसांशी संबंधित व्यवसाय करण्याचा विचार केला होता. त्यावेळी व्यवसायासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. या व्यवसायासाठी सुरुवातीला तिने केसांचा शोध घेतला. अखेर जयपूरमधील एका विक्रेत्याकडून तिने 2000 रुपये किमतीचे केस विकत घेतले. यानंतर शैलीने स्वतःच्या शिलाई मशीनने त्या केसांचे विग तयार करुन आपल्या नातेवाईकांना विकेल.

अमन गुप्ता कडून ऑफर मिळाली
पुढे शैलीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिने वेबसाइट सुरू केली. हळुहळू तिला अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. सध्या शैलीच्या स्टार्टअपची वार्षिक कमाई सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. शैलीने अवघ्या 2000 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज 10 कोटी रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, शार्क टँकमध्ये आल्यानंतर बोटचे संस्थापक अमन गुप्ताने शैलीला तिच्या कंपनीत 3 टक्क्यांच्या बदल्यात 30 लाख रुपयांची ऑफर दिली.

Web Title: Shark Tank India-3: Started a business with 2000 rupees and built a company worth 10 crores, now Aman Gupta made a big offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.