Join us  

पैसा कमावण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करावी की शेअर बाजारात? पाहा कुठे मिळतील बंपर रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:04 AM

जाणून घ्या कुठे गुंतवणूक केल्यानंतर मिळेल अधिक फायदा.

शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वाढ होत आहे. तर दुसरीकडे अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायलाही आवडते. हा एक चांगला गुंतवणुकीचा पर्यायही मानला जातो. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काय चांगले असेल, सोनं किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल? असे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील. गेल्या काही वर्षांत सोनं आणि शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कुठे चांगला परतावा मिळाला आहे जाणून घेऊ.

शेअर बाजारात किती रिटर्न?शेअर बाजारातील गेल्या ५ वर्षांचा विचार केल्यास जुलै २०१८ च्या अखेरिस बाजार ३७७५० रुपयांच्या पातळीवर होता. सध्या तो ६६ हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यात सुमारे ८० टक्क्यांची वाढ झालीये.

सोन्यात किती रिटर्नगेल्या ५ वर्षात सोन्याच्या किमतीत ९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८ पासून त्यात वेगानं वाढ झालीये. तुलनेत बीएसई सेन्सेक्स पाहिला तर तो जवळपास ८० टक्क्यांनी वाढला आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परतावा मिळालाय.

लाँग टर्ममध्ये मिळणार फायदातज्ज्ञांच्या मते, दीर्घ मुदतीसाठी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना उत्कृष्ट परतावा मिळाला आहे. सोने हे एक डेड असेट म्हटलं जातं. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सोन्याच्या किमती दुहेरी अंकात वाढल्या आहेत. शेअर बाजाराच्या तुलनेत मजबूत परतावा देण्याच्या दृष्टीनं सोनं हा एक चांगला पर्याय असल्याचं सिद्ध झालंय.

सोन्याचे वाढतायत दरसोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. आतापर्यंत ५८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर असलेल्या सोन्याचे दर आता ६० हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

गुंतवणूकीचा चांगला पर्यायसोन्यातील गुंतवणूक आजही चांगला पर्याय मानली जाते. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचे चढ उतार झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होते. भारत सोन्याची जगातील सर्वाधिक आयात करणारा देश आहे. सोन्याच्या आयातीमुळे ज्वेलरी इंडस्ट्रीच्या मागण्या पूर्ण केल्या जातात.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक