Join us

Silver Rate Down : शेअर मार्केटनंतर चांदीच्या दरातही मोठी घसरण; गुंतवणुकीला संधी; सोन्याची काय स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 11:59 AM

Silver Rate Down: शेअर मार्केटनंतर चांदीच्या दरातही आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरावर याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

Silver Rate Down : शेअर मार्केटनंतर आज सराफा बाजारात खळबळ उडवून देणारी गोष्ट घडली आहे. सोनं चमकत असताना चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कारण आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव घसरत असून त्याचा परिणाम चांदीच्या दरांवर होत आहे. चांदीचे दर आणखी घसरणार का? सोन्याचं काय होणार? गुंतवणूक करण्यासाठी आताची वेळ योग्य आहे का? चला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. 

चांदीची स्थिती कशी आहे?आजच्या कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरांवर नजर टाकली तर चांदीच्या दरात १०७७ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या चांदी ९१,२८० रुपये प्रतिकिलो दरावर आला आहे. आज वरचा दर बघितला तर तो ९२,२२३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, तर खालच्या दरात तो ९१,२६४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आजच्या चांदीच्या घसरणीवर नजर टाकली तर ती १.१७ टक्क्यांनी घसरली आहे. अशाप्रकारे चांदी ९२ हजार रुपयांच्या खाली घसरली आहे.

सोन्याच्या दरात फारसा चढ-उतार नाहीचांदी घसरत असताना सोन्याच्या दरावर मात्र फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. आज सोन्याचा दर ७५८७१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. पिवळा धातू १७४ रुपयांनी स्वस्त झाला आहे. सोन्याच्या वरच्या दरांवर नजर टाकली तर ७५,९२० रुपये प्रति १० ग्रॅमचा भाव दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला भावआंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीच्या किमतींवर नजर टाकली तर चांदीमध्ये लक्षणीय घट झाली असून ती एक टक्क्यांहून अधिक घसरली आहे. चांदीचा दर प्रति औंस ३१.६७२ डॉलर वर पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही चमकदार चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कलाचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे, असे म्हणता येईल.

तुमच्या शहरात चांदीची किंमत किती आहे?दिल्लीत आज चांदी ९६,००० रुपये किलोने विकली जात आहे.मुंबईतही आज चांदीचा दर ९६,००० रुपये प्रतिकिलो आहे.आज चेन्नईमध्ये चांदीचा भाव १,०२,००० रुपये प्रति किलो इतका आहे.कोलकातामध्ये आज चांदी ९६,००० रुपये प्रतिकिलो आहे.

गुंतवणुकीची संधी?कमोडिटी बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की चमकदार धातू चांदीच्या किमतीत आजची घसरण ही कमोडिटी व्यापाऱ्यांसाठी चांगली खरेदीची संधी ठरू शकते. व्यापारी खरेदीची संधी शोधत आहेत, जे दीर्घ मुदतीसाठी चांगला व्यापार सिद्ध होऊ शकेल. 

टॅग्स :चांदीसोनंगुंतवणूकशेअर बाजार