Lokmat Money >गुंतवणूक > दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला

दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला

योग्य वयात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:39 PM2024-04-25T18:39:28+5:302024-04-25T18:39:41+5:30

योग्य वयात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो.

SIP Power: Invest Rs 30,000 Every Month and Get Rs 5 Croreस Know Formula | दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला

दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला

SIP Power: प्रत्येकाच्या आयुष्यात गुंतवणूक फार महत्वाची आहे. गुंतवणूकीमुळे म्हातारपणात आरामदायी जीवन जगता येते. पण, यासाठी तरुण वयात गुंतवणूक सुरू करणे गरजेचे आहे. योग्य वयात गुंतवणूक सुरू केली, तर उतारवयात कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, तुम्ही योग्य वेळी केलेली गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते. यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणेही तितकेच आवश्यक आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच SIP गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये दरमहा 30,000 रुपये गुंतवून तुम्ही 5 कोटी रुपयांचा निधी मिळवू शकता.

19 वर्षांत मिळवा 5 कोटी रुपये
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ही एक दीर्घकालीन गुंतवणूक स्कीम आहे, ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मजबूत परतावा मिळतो. विशेष म्हणजे, तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा लाभही दिला जातो. तुम्ही SIP मध्ये दरमहा 30,000 रुपये जमा केल्यास आणि ही गुंतवणूक 19 वर्षे चालू ठेवल्यास तुम्हाला 5 कोटी रुपये मिळू शकतात. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की, बाजार जोखमीच्या अधीन असून, परताव्याची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. पण, तुम्ही SIP चा इतिहास पाहिला, तर त्याने गुंतवणूकदारांना 10-15 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. 

गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी 10% वाढवा
तुम्हाला 5 कोटी रुपये हवे असतील, तर एक सूत्र लक्षात ठेवा. तुम्ही दरमहा SIP मध्ये 30,000 रुपये गुंतवले, त्यात दरवर्षी 10% वाढ केली आणि तुम्हाला 12 टक्के परतावा मिळाला, तर 19 वर्षांत तुम्ही 5 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. विशेष बाब म्हणजे, या मोठ्या निधीतील 50 लाख रुपये पहिल्या 7 वर्षात वसूल होतील. पण, तुम्ही तुमच्या गुंतवणूकीत दरवर्षी 10 टक्के वाढ केली नाही, तर एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार 5 कोटी रुपये जमा होण्यासाठी तुम्हाला 24 वर्षे लागतील.
 

(टीप- शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: SIP Power: Invest Rs 30,000 Every Month and Get Rs 5 Croreस Know Formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.