Lokmat Money >गुंतवणूक > SIP मध्ये मुलांचं भविष्य होईल ‘ब्राईट’; ७ वर्षांमध्ये होतील ५० लाख, जाणून घ्या कसं?

SIP मध्ये मुलांचं भविष्य होईल ‘ब्राईट’; ७ वर्षांमध्ये होतील ५० लाख, जाणून घ्या कसं?

पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. मुलांच्या शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लग्नापर्यंतची काळजी पालकांना लागून असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:35 AM2022-11-16T11:35:12+5:302022-11-16T11:37:13+5:30

पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. मुलांच्या शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लग्नापर्यंतची काळजी पालकांना लागून असते.

sip systematic investment plan for child future will get 50 lakh rupees in 7 years know details investment tips money more than double | SIP मध्ये मुलांचं भविष्य होईल ‘ब्राईट’; ७ वर्षांमध्ये होतील ५० लाख, जाणून घ्या कसं?

SIP मध्ये मुलांचं भविष्य होईल ‘ब्राईट’; ७ वर्षांमध्ये होतील ५० लाख, जाणून घ्या कसं?

पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. मुलांच्या शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लग्नापर्यंतची काळजी पालकांना लागून असते. त्यामुळेच अनेक जण बचतीचा पर्याय स्वीकारतात. दुसरीकडे आज ज्या दराने महागाई वाढत आहे, यामुळे तुमच्या बचतीच्या पैशाचे मूल्य हळूहळू कमी होत आहे. अशा स्थितीत मुलांच्या भविष्याकडे पाहून आपण जमा केलेल्या पैशाचं मूल्य कमी होत जातं. बचतीच्या पैशांवर चांगला परतावा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवली पाहिजे. याचा तुम्हाला भविष्यातील गरजा भागवण्यासाठीही फायदा होऊ शकतो.

तुम्ही गुंतवणूक सुरू करत असाल तर वेळेची वाट पाहू नका. जेव्हा तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तेव्हापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करावी. गुंतवणुकीसाठीही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करत असाल त्यात हळूहळू वाढ केली ​​पाहिजे.

SIP मध्ये गुंतवणूक
तुम्हाला जास्त परतावा हवा असेल, तर तुमच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक चांगला पर्याय आहे. SIP द्वारे तुम्हाला काही वर्षात चांगला परतावा मिळू शकतो, यासाठी तुम्ही दरमहा किमान 500 रुपये गुंतवायला हवे. जर तुम्ही दरमहा 1000 रुपये गुंतवले तर त्यानंतर तुम्ही 20 वर्षात 20 लाख रुपये कमवू शकता. ही गणना सरासरी 12 टक्के वार्षिक व्याजावर करण्यात आली आहे. जर तुम्हाला 7 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी उभा करायचा असेल तर तुम्हाला दरमहा 40,000 रुपये गुंतवावे लागतील. हे पैसे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नकार्यासाठी वापरू शकता.

काय म्हणतायत तज्ज्ञ?
एसआयपी तज्ञांचे म्हणणे आहे की मोठ्या रकमेनंच गुंतवणूक सुरू करणं आवश्यक नाही. तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु एसआयपीद्वारे 500 रुपये गुंतवणे चांगले. प्रत्येक महिन्याला नियमितपणे 500 रुपये गुंतवल्यास ती रक्कम 5 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकते.

(टीप - या लेखात केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: sip systematic investment plan for child future will get 50 lakh rupees in 7 years know details investment tips money more than double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.