Lokmat Money >गुंतवणूक > SIP vs SWP : SIP आणि SWP मध्ये काय आहे फरक? कशात मिळेल जास्त फायदा? टॉप 5 SWP म्युच्युअल फंड

SIP vs SWP : SIP आणि SWP मध्ये काय आहे फरक? कशात मिळेल जास्त फायदा? टॉप 5 SWP म्युच्युअल फंड

SIP vs SWP : SIP आणि SWP या दोन्ही म्युच्युअल फंडाशी संबंधित गुंतवणूक पद्धती आहेत. परंतु, दोन्हींचे उद्देश वेगवेगळे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:04 PM2024-09-13T14:04:41+5:302024-09-13T14:05:27+5:30

SIP vs SWP : SIP आणि SWP या दोन्ही म्युच्युअल फंडाशी संबंधित गुंतवणूक पद्धती आहेत. परंतु, दोन्हींचे उद्देश वेगवेगळे आहेत.

sip vs swp which is better what is the difference 5 best swp mutual funds | SIP vs SWP : SIP आणि SWP मध्ये काय आहे फरक? कशात मिळेल जास्त फायदा? टॉप 5 SWP म्युच्युअल फंड

SIP vs SWP : SIP आणि SWP मध्ये काय आहे फरक? कशात मिळेल जास्त फायदा? टॉप 5 SWP म्युच्युअल फंड

SIP vs SWP : शेअर मार्केटमध्ये कमी जोखमीत गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी SIP आणि SWP यांची नावे तुम्हीही ऐकली किंवा असतील. शेअर बाजारातील चढउतारांमुळे धोका पत्करण्याची भीती वाटत असेल. पण, तरीही पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा असेल. तर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही SIP आणि SWP सारख्या पद्धती निवडू शकता. मात्र, याआधी दोन्ही फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

SIP म्हणजे काय?
SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. याद्वारे गुंतवणूकदार एकरकमी रकमेऐवजी म्युच्युअल फंडात वेळोवेळी लहान-लहान रक्कम गुंतवतात. एसआयपीद्वारे ठराविक कालावधित एक निश्चित रक्कम तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडात जमा करता येते. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार दररोज, मासिक, त्रैमासिक किंवा त्यांच्या निवडीनुसार कोणत्याही तारखेला गुंतवणूक करू शकतात.

SIP चे फायदे काय आहेत?
मोठ्या रकमेची गरज नाही : जर तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ती दरमहा फक्त 100 रुपयांपासून देखील सुरू करू शकता. जेव्हा तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवायची असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार ती वाढवू शकता.

गुंतवणुकीतील लवचिकता : तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. अशात तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण आली तर तुम्ही ती काही काळ थांबवू शकता. म्हणजेच तुम्हाला या योजनेत लवचिकता मिळेल.

चक्रवाढीचा जादू : तुम्हाला एसआयपीमध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावरही तुम्हाला रिटर्न मिळतात. याशिवाय, एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळतो. कधीकधी हा परतावा यापेक्षाही जास्त असतो. अशा परिस्थितीत एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगला फंड तयार करू शकता.

बचत आणि आर्थिक शिस्त : तुम्ही SIP द्वारे बचत करायला शिकता. तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर कितीही पैसे गुंतवता येते. तुम्ही बचत करण्यावर भर देऊन खर्च कमी करता. यामुळे तुमच्यामध्ये आर्थिक शिस्त तयार होते.

SWP म्हणजे काय?
गुंतवणूकदाराच्या दृष्टीने एसआयपीप्रमाणेच SWP देखील खूप महत्त्वाचे आहे. SWP म्हणजे सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन. याद्वारे, गुंतवणूकदार ठराविक अंतराने म्युच्युअल फंड योजनांमधून ठराविक रक्कम काढू शकतात. किती रक्कम काढायची आणि किती वेळेत काढायची हे गुंतवणूकदार स्वतः ठरवतात. ते मासिक किंवा त्रैमासिक आधारावर निश्चित रक्कम काढू शकतात. त्यांचा मासिक पर्याय (नियमित मासिक उत्पन्न) अधिक लोकप्रिय आहे.

तुम्ही जर रिटायरमेंट प्लानिंग करत असाल तर SWP तुमच्यासाठी ब्रह्मास्त्र आहे. ज्यांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमधून नियमित उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. नियमित कैश फ्लोची गरज असलेल्यांसाठी ही योजना अतिशय चांगली आहे. एसआयपीचा वापर गुंतवणुकीसाठी केला जातो, तर एसडब्ल्यूपीचा वापर म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासाठी केला जातो.

SWP चे फायदे काय आहेत?
नियमित उत्पन्नाचा स्रोत : तुमच्या नियमित गरजा भागवण्यासाठी पैसे पुरवण्यात मदत करते. रिटायरमेंटदरम्यान ते तुमच्या मासिक उत्पन्नाचे स्रोत म्हणूनही काम करू शकते.

गुंतवणुकीतील सातत्य : तुम्ही पैसे काढले तरी उर्वरित गुंतवणूक वाढतच राहण्याची शक्यता असते. तुमचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ एक्टिव ठेवत नियमित उत्पन्न मिळवणे सुरू ठेवू शकता.

भारतातील 5 टॉप परफॉर्मिंग SWP म्युच्युअल फंड

  1. HDFC हायब्रीड इक्विटी फंड
  2. ICICI प्रू बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड
  3. SBI मॅग्नम बॅलन्स्ड फंड
  4. आदित्य बिर्ला एसएल बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड
  5. डीएसपी इक्विटी आणि बाँड फंड – डायरेक्ट ग्रोथ

Web Title: sip vs swp which is better what is the difference 5 best swp mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.