Lokmat Money >गुंतवणूक > सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

Small Saving Schemes: 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान PPF, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 09:03 PM2024-09-30T21:03:44+5:302024-09-30T21:03:51+5:30

Small Saving Schemes: 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान PPF, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Small Saving Schemes: Interest on all small savings schemes not increased | सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

Small Saving Schemes: सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि इतर अल्पबचत योजनांवरील व्याजदरांबाबत निर्णय जाहीर केला आहे. सरकारच्या निर्णयानुसार, या योजनांवरील व्याजदर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच, तुम्हाला 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या तिसऱ्या तिमाहीत या योजनांवर वाढीव व्याज मिळणार नाही. 

याचा अर्थ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये यंदाही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तुम्हाला जुन्या दरांवरच व्याज मिळेल. विशेष म्हणजे, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून PPF च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

अल्पबचत योजनांमध्ये किती व्याज मिळते?

पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर 7.4 टक्के
किसान विकास पत्रावर 7.5 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के

अर्थ मंत्रालयाने निर्णय जाहीर केला
30 सप्टेंबर 2024 रोजी किसान विकास पत्र (KVP), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यासारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन केल्यानंतर वित्त मंत्रालयाने आज हा निर्णय घेतला आहे. लहान बचत योजनांवर 4 टक्के ते 8.2 टक्के व्याजदर आहेत. सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वर 7.1 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 टक्के आहे. PPF, NSC आणि KVP सह लहान बचत योजनांवरील व्याजदरांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन केले जाते. सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये व्याजदरात वाढ केली होती.

Web Title: Small Saving Schemes: Interest on all small savings schemes not increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.