Highest FD Rates: गेल्या वर्षापासून फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर सातत्यानं वाढत आहेत. यानंतर एफडीमध्येही गुंतवणूकीत वाढ झालीये. अशा काही बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत एफडीवर ग्राहकांना सर्वाधिक व्याज मिळत आहे. बँकेनं एफडी व्याजदरात रिव्हिजनची घोषणा केलीये.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. बँकेनं काही ठराविक एफडीच्या व्याजदरात बदल केलेत. या अंतर्गत गुंतवणूकदारांना ९.१ टक्क्यांपर्यंतचं व्याज मिळत आहे. बँकेचे हे नवे व्याजदर ७ ऑगस्ट पासून लागू करण्यात आलेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे नवे दरबँकेच्या नव्या व्याजदरांतर्गंत सामान्य जनतेला ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ४ टक्क्यांपासून ८.६० टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहे. तर सीनिअर सीटिझन्सना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मॅच्युरिटीच्या एफडीवर ४.५० ते ९.१० टक्क्यांपर्यंतचं व्याज दिलं जातंय. हे व्याज २ कोटींपेक्षा कमीच्या एफडीवर दिलं जात असल्याचं बँकेनं म्हटलंय.
कोणाला किती व्याज
- ९ महिन्यांपेक्षा अधिक ते १ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य नागरिकांना ६ टक्के आणि सीनिअर सीटिझन्सना ६.५० टक्के व्याज दिलं जातंय.
- १ वर्ष ते १५ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूकीवर सामान्य लोकांना ८.२५ टक्के आणि सीनिअर सीटिझन्सना ८.७५ टक्के व्याज दिलं जातंय.
- ५ ते १० वर्षांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सामान्य नागरिकांना ७.२५ आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्क्यांचं व्याज दिलं जातंय.
- ५ वर्षआंच्या गुंतवणूकीवर सामान्य नागरिकांना ८.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ८.७५ टक्क्यांचं व्याज दिलं जातंय.
- २ ते ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी सामान्य नागरिकांना ८.६० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९.१० टक्क्यांचं व्याज दिलं जातंय.
गुंतवणूक किती सुरक्षित ?रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार स्मॉल फायनान्स बँकांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतच्या एफडीचा विमा केला जातो. पैसे बुडाल्यास ग्राहकांना विना नुकसान ते मिळतात. परंतु यापेक्षा जास्त गुंतवणूक असल्यास स्मॉल फायनान्स बँकेची जोखीम क्षमता तपासणं आवश्यक आहे.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)