Join us  

Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँडच्या नवीन हप्त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! काय आहे सरकारच्या मनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 11:38 AM

Sovereign Gold Bond: या वर्षी फेब्रुवारीनंतर सरकारने सॉवरेन गोल्ड बाँडचा नवीन हप्ता जारी केलेला नाही. अशा स्थितीत SGB मध्ये गुंतवणूककरांची प्रतीक्षा वाढत आहे.

Sovereign Gold Bond: तुम्ही जर सॉवरेन गोल्ड बाँडच्या नवीन हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. एसजीबीचा नवीन हप्ता जारी करण्यात सरकारला रस नसल्याचे दिसत आहे. यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार एसजीबीचा नवीन हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे. यामागे अनेक कारणे आहेत. गोल्ड लोनपासून मिळणारे कर्ज सरकारला इतर कर्जांपेक्षा महाग पडत आहे. एसजीबी सामाजिक सुरक्षितता स्कीम नसल्याने त्यावर जास्त पैसे खर्च करुन फायदा नाही.

बीएसई आणि एनएसईमध्ये एसजीबीची ट्रेडिंग होतेजे गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बाँडच्या नवीन हप्त्याची वाट पाहात आहे, ते दुय्यम बाजारातून ते खरेदी करू शकतात, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. बीएसई आणि एनएसई मध्ये एसजीबीची हप्त्यावर ट्रेडिंग होते. मागील वर्षी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. याचा सरकारी तिजोरीवर भार वाढल्यानेही सॉवरेन गोल्ड बाँडमधील रस कमी झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या १० वर्षात सोन्याचा भाव वेगाने वर जात आहे. त्यामुळे एसजीबीच्या परिपक्वतेनंतर गुंतवणूकदारांना पैसे देण्यासाठी सरकारला मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडचे आतापर्यंत ६७ हप्तेगेल्या आर्थिक वर्षात (२०२३) सॉवरेन गोल्ड बाँडच्या पूर्ततेसाठी सरकाराने २ हजार ४२४ कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. FY२५ मध्ये हे वाढून ८ हजार ५५१ एवढे झाले आहे. हे गेल्या वर्षाच्या तुलनेत २५० टक्के अधिक आहे. आतापर्यंत भारती रिझर्व्ह बँकने सॉवरेन गोल्ड बाँडचे ६७ हप्ते जारी केले आहे. गुंतवणूकदारांनी या योजनेत ७२ हजार २७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील ४ हप्ते परिपक्व झाले आहेत. याचा अर्थ या हप्त्याचे पेमेंट सरकारने केले आहे.

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सुरुवात कधी झाली?सरकारतर्फे भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे ही योजना चालवली जाते. हे बाँड ८ वर्षात परिपक्व होतात. गुंतवणूकदारांना यावर वार्षिक २.५ टक्के व्याजदर मिळतो. हे बाँड परिपक्व झाल्यानंतर सोन्याच्या दरानुसार गुंतवणूकदारांना पैसे दिले जातात. 

टॅग्स :गुंतवणूकभारतीय रिझर्व्ह बँकसोनं