सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सनं (Sovereign Gold Bond) आपल्या गुंतवणूकदारांना ८ वर्षांत १२२ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून २०१६ मध्ये जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सच्या पहिल्या टप्प्याच्या रिडेम्पशन मूल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे मूल्य ६,९३८ रुपये प्रति ग्रॅम (प्रति युनिट) इतके घोषित करण्यात आले आहे. ८ वर्षांपूर्वी गुंतवणुकीच्या वेळी ते ३,११९ रुपये प्रति ग्रॅम इतकं होतं. याचाच अर्थ ८ वर्षांत गुंतवणूकदारांना १२२ टक्के परतावा मिळाला आहे. या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सोन्याप्रमाणेच भरघोस परतावा मिळाल्याचे दिसत आहे.
रिडेम्पशनला सुरुवात
- गुंतवणूकदारांना रिडेम्पशन मूल्याची अदायगी सोमवारपासून सुरूही करण्यात आली आहे. ही केंद्र सरकारची योजना असून बॉन्ड रिझर्व्ह बँकेकडून जारी केले जातात. ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली.
- हे रोखे ८ वर्षात मॅच्युअर होतात. सोमवारी मॅच्युअर झालेले बॉन्ड ऑगस्ट २०१६ मध्ये जारी करण्यात आले होते. या गुंतवणूकदारांनी बॉन्ड्सवर प्रति ग्रॅम ३,८१९ रुपयांची कमाई झाली आहे.
अशी निश्चित होते किंमत
- सॉवरेन गोल्ड बॉन्ड्सची किंमत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडच्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या ३ दिवसांच्या किमतीच्या सरासरीएवढी निश्चित केली जाते.
- योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक २.५ टक्के दराने व्याजही दिले जाते. व्याजाची रक्कम दर ६ महिन्यांनी दिली जाते.
- या योजनेत बॉन्ड्स युनिटच्या आधारावर खरेदी केले जातात. एक युनिट एक ग्रॅमच्या बरोबरीत असतो.