Lokmat Money >गुंतवणूक > Sovereign Gold Bond : तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा

Sovereign Gold Bond : तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा

Sovereign Gold Bond Returns : सोवरेन गोल्ड बाँडनं आपल्या गुंतवणूकदारांना तुफान रिटर्न्स दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:42 AM2023-04-15T11:42:37+5:302023-04-15T11:43:11+5:30

Sovereign Gold Bond Returns : सोवरेन गोल्ड बाँडनं आपल्या गुंतवणूकदारांना तुफान रिटर्न्स दिले आहेत.

Sovereign Gold Bond huge returns government gold bond doubled investors money See how to get 105 percent profit | Sovereign Gold Bond : तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा

Sovereign Gold Bond : तुफान रिटर्न्स, सरकारी गोल्ड बाँडनं केले गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; पाहा कसा मिळाला १०५ टक्के नफा

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सोवरेन गोल्ड बाँड २०१७-१८ सीरिज III मध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी किंमत निश्चित केली आहे. या बाँडचा मॅच्युरिटी कालावधी आठ वर्षांचा आहे. पण गुंतवणूकदार मुदतीपूर्वी पैसे काढू शकतात. याची निश्चित तारीख १५ एप्रिल २०२३ आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा झाला आहे. गोल्ड बाँड योजनेंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी जारी केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी दिली जाते.

सॉवरेन गोल्ड बाँड २०१७-१८ स्कीम सिरीज III ची इश्यू प्राईज २९६४ रुपये प्रति ग्रॅम होती. रिझव्‍‌र्ह बँकेनं रिडेम्पशन रेट ६०६३ रुपये प्रति ग्रॅम निश्चित केलंय, जो इश्यू प्राईजपेक्षा १०४ टक्के अधिक आहे. जर गुंतवणूकदारांनी मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय निवडला तर त्यांना १०४.५५ टक्के परतावा मिळेल. हे बाँड १६ ऑक्टोबर २०१७ रोजी जारी करण्यात आले.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) अहवालानुसार, गेल्या तीन कामकाजाच्या दिवसातील सोन्याचा सामान्य दर सरकारी सोवरेन गोल्ड बाँडच्या रिडेम्पशन प्राईज व्हॅल्यूच्या आधारावर काम करेल. त्यानुसार, गोल्ड बाँडच्या रिडेम्पशनसाठी किंमत ६०६३ रुपये असेल.

सोन्याची किंमत वाढली
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठलाय. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर ४८० रुपयांनी वाढून ६१,७८० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे. सोन्याच्या गुंतवणूकीनं यंदा जोरदार रिटर्न्स दिले आहेत. 

 

Web Title: Sovereign Gold Bond huge returns government gold bond doubled investors money See how to get 105 percent profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.