Join us  

सॉवरेन गोल्ड बाँड की गोल्ड ईटीएफ? 'या' दिवाळीत कुठे गुंतवणूक करणे राहील योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:45 AM

Sovereign Gold Bond Or Gold Etf : तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांचे आकर्षण नसेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

Sovereign Gold Bond Or Gold Etf  : आजपासून देशभरात मोठ्या उत्साहाने दिवाळीला सुरुवात झाली आहे. अनेकजण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करतात. तुम्हीही तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगले गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर फिजिकल गोल्डव्यतिरिक्त, तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. 

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB)सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) हे सरकारी सिक्युरिटीज आहेत, ज्याचे मूल्य ग्रॅममध्ये असते. याकडे भौतिक सोन्याचा पर्याय म्हणून देखील पाहिले जाते. दरवर्षी हे सुवर्ण रोख्यांची किंमत सरकारकडून जाहीर केली जाते. हे बाँड भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे जारी केले जातात. गुंतवणूकदाराने दिलेली सोन्याची रक्कम सुरक्षित राहते. कारण त्याला मुदतपूर्व पैसे काढण्याच्या वेळी बाजारमूल्य मिळते. हे भौतिक सोन्यापेक्षा बेस्ट मानले जाते. कारण, या सांभाळण्याची जोखीम नसते. आभूषणाच्या रुपात खरेदी केल्यास घडणावर खर्च आणि शुद्धतेची हमी याबद्दलही शंका असते.

सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणुकीचे फायदेजे ५ ते ८ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत त्यांच्यासाठी SGB हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. एसजीबी २.५% दराने व्याज देतात जे अर्धवार्षिक वितरीत केले जाते. बाँड जारी केल्याच्या तारखेपासून ८ वर्षांच्या शेवटी मुदतपूर्तीच्या रकमेसह अंतिम व्याज दिले जाते.एसजीबी ​​वर उपलब्ध असलेले फायदे कर-अनुकूल आहेत. बाँडवरील रिडेम्पशन रकमेला भांडवली लाभ करातून सूट दिली जाते. रोख्यांवर मिळणारे व्याज करपात्र आहेत. मात्र, स्त्रोतावर कोणताही कर कापला जात नाही.कोणीही व्यक्ती, ट्रस्ट, एचयूएफ, धर्मादाय संस्था आणि विद्यापीठे यासारख्या संस्थादेखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

सोने ईटीएफगोल्ड ईटीएफ हा एक एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) आहे. ज्याचा उद्देश फिजिकल गोल्ड किमतीला ट्रॅक करणे आहे. एक गोल्ड ईटीएफ युनिट १ ग्रॅम सोन्याच्या समतुल्य असून शुद्ध सोन्याचा आधार आहे. गोल्ड ईटीएफ स्टॉकच्या स्वरूपात असल्याने ते विकणे सोपे आहे. गोल्ड ईटीएफ हे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (BSE) वर कोणत्याही कंपनीच्या स्टॉकप्रमाणे लिस्टेड आणि ट्रेड केले जातात. गोल्ड ईटीएफ खरेदी करणे म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने खरेदी करत आहात. तुम्ही जसे स्टॉकचे व्यापार करता तसे तुम्ही गोल्ड ईटीएफ खरेदी आणि विक्री करू शकता.

ETF मध्ये गुंतवणुकीचे फायदेETF ची किंमत अधिक पारदर्शक आणि सोन्याच्या वास्तविक बाजारभावाच्या जवळ आहे. गोल्ड ईटीएफ हे SGB पेक्षा जास्त लिक्विड असतात कारण ते शेअर बाजारात सहज खरेदी आणि विकता येतात.गोल्ड ईटीएफ सामान्यत: ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना म्हणून ओळखली जाते. गुंतवणूकदार त्यांना हवे तोपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतात. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीतील चढ-उतारांमुळे उत्पन्न होणाऱ्या परताव्याचा फायदा घेऊ शकतात. कोणतीही व्यक्ती सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकते.

टॅग्स :सोनंगुंतवणूकभारतीय रिझर्व्ह बँक