Lokmat Money >गुंतवणूक > या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा

या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा

Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. काही बँका विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:40 AM2024-06-21T11:40:09+5:302024-06-21T11:41:08+5:30

Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. काही बँका विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता.

Special Fixed Deposit Scheme of 3 banks to end this month interest up to 8 percent Check details idbi indian bank punjab and sindh bank | या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा

या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा

Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. इंडियन बँक, आयडीबीआय बँक आणि पंजाब अँड सिंध बँक विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता.

IDBI Bank स्पेशल एफडी स्कीम

आयडीबीआय बँक आपल्या लाखो ग्राहकांना खास फिक्स्ड डिपॉझिट ऑफर करत आहे. आयडीबीआय बँक ३०० दिवस, ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांची विशेष एफडी स्कीम देत आहे. त्यावर ७.७५ टक्के व्याज दिलं जातंय. ही विशेष स्कीम ग्राहकांसाठी ३० जून २०२४ पर्यंत उपलब्ध आहे.

IDBI उत्सव ४०० स्कीम (IDBI Utsav Special 400 days FD)

आयडीबीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, ग्राहक उत्सव एफडी योजनेत ३० जून २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकतात. आयडीबीआय बँक नियमित ग्राहक, एनआरआय आणि एनआरओ ग्राहकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.२५% दराने व्याज देत आहे. बँक गुंतवणूकदारांना एफडीतून मुदतपूर्व रक्कम काढण्याची आणि बंद करण्याची परवानगी देते.

IDBI उत्सव स्कीम ३७५ दिवस

आयडीबीआय बँक ३७५ दिवसांच्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज देत आहे. तर नियमित ग्राहक, एनआरआय आणि एनआरओ ग्राहक ३७५ दिवसांच्या एफडीवर ७.१०% व्याज देत आहेत. बँक या एफडीमध्ये वेळेपूर्वी पैसे काढण्याचा किंवा बंद करण्याचा पर्यायही देते.

IDBI उत्सव ३०० दिवसांची एफडी

आयडीबीआय बँक ३०० दिवसांच्या उत्सव एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज देत आहे. तर, नियमित ग्राहक, एनआरआय आणि एनआरओ ग्राहक ३०० दिवसांच्या एफडीवर ७.०५ टक्के व्याज देत आहेत. या एफडीमध्ये मुदतपूर्व पैसे काढता येतात.

इंडियन बँक स्पेशल Fixed Deposit

इंडियन बँक ग्राहकांना खास एफडी स्कीम देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक इंडियन बँक आपल्या ग्राहकांना ३०० आणि ४०० दिवसांची एफडी ऑफर करत आहे. इंडियन बँकेच्या वेबसाईटनुसार ३० जून २०२४ पर्यंत इंड सुपर ४०० आणि इंड सुप्रीम ३०० या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करता येईल.

इंड सुपर ४०० दिवसांची एफडी स्कीम (Ind Super 400 days)

ही एक खास एफडी कॉलेबल एफडी आहे. कॉलेबल एफडी म्हणजे तुम्हाला वेळेआधी पैसे काढण्याचा पर्याय मिळतो. इंडियन बँकेची इंड सुपर एफडी ४०० दिवसांची आहे. या स्कीममध्ये तुम्ही १०,००० रुपयांपासून २ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. इंडियन बँक आता सर्वसामान्यांना ७.२५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ८.०० टक्के व्याज देत आहे.

इंड सुपर ३०० दिवस (Ind Super 300 days)

इंडियन बँकेच्या वेबसाइटनुसार, स्पेशल टर्म डिपॉझिट प्रॉडक्ट इंड सुपर ३०० डेज १ जुलै २०२३ रोजी लाँच करण्यात आली होती. या एफडीवर तुम्ही ३०० दिवसांसाठी ५००० ते २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकता. बँक ७.०५ ते ७.८० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. इंडियन बँक आता सर्वसामान्यांना ७.०५ टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के व्याज देत आहे.

पंजाब अँड सिंध बँक स्पेशल एफडी स्कीम

पंजाब अँड सिंध बँक आपल्या ग्राहकांना २२२ दिवस, ३३३ दिवस आणि ४४४ दिवसांची विशेष एफडी देत आहे. या स्पेशल एफडीवर जास्तीत जास्त ८.०५ टक्के व्याज मिळत आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक २२२ दिवसांच्या एफडीवर ७.०५ टक्के, ३३३ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. बँक अतिज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज देत आहे.

Web Title: Special Fixed Deposit Scheme of 3 banks to end this month interest up to 8 percent Check details idbi indian bank punjab and sindh bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.