Join us

महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:18 PM

या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. त्यातून मोठा परतावाही मिळतो. पाहूया कोणती आहे ही स्कीम.

लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवते. याअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांचा समावेश होतो, ज्यावर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळात आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार महिला सन्मान बचत योजना (Mahila Samman Savings Certificate) राबवते. या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात. त्यातून मोठा परतावाही मिळतो. चला जाणून घेऊया त्याविषयीची सविस्तर माहिती.

कोण उघडू शकतं खातं?

महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेअंतर्गत १८ वर्षांवरील महिला गुंतवणूक करू शकतात, तर अल्पवयीन मुलींसाठी त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात. या योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज घ्यावा लागतो. यानंतर फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरून आवश्यक कागदपत्रं द्यावी लागतात.

किती रक्कम भरावी लागते?

ही योजना दोन वर्षांत मॅच्युअर होत असून प्रत्येक तिमाहीवर व्याज मिळतं. यामध्ये चक्रवाढ पद्धतीनं व्याज दिलं जातं. या योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम १००० रुपये आहे, तर जास्तीत जास्त गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत २ लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. खातेदार एक वर्षानंतर गुंतवणुकीच्या रकमेच्या ४० टक्के रक्कम काढू शकतात.

किती मिळतं व्याज?

ऑक्टोबरमध्ये सरकारने सर्व अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बदल केला होता. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. खातेदार खातं उघडल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीनंतर बंद प्री-मॅच्युअर खातं बंद करू शकतात. असं केल्यास २ टक्के कमी व्याज दिलं जाईल. ही योजना एप्रिल २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती, तर मार्च २०२५ ही योजना बंद होईल.

टॅग्स :पैसागुंतवणूक