Join us  

अंधत्वामुळे IITने प्रवेश नाकारला; अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात कोट्यवधीचा व्यवसाय सुरू केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:45 PM

Srikant Bola Success Story : अंधत्वावर मात करत श्रीकांत बोला यांनी शंभर कोटींचा व्यवसाय उभारला. वाचा त्यांची Success Story...

Srikant Bola Success Story : जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करुन आयुष्यात खूप मोठ्या गोष्टी मिळवल्या आहेत. श्रीकांत बोला(Srikant Bolla) हे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर श्रीकांत बोलांचे नाव/फोटो पाहिला असेल. फोटो पाहिल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की, श्रीकांत अंध आहेत. 

मानवाचा सर्वात महत्वाचा अवयव डोळा आहे. डोळ्याशिवाय आपण काहीच पाहू शकत नाही. पण, श्रीकांत यांनी या अंधत्वावर मात करत एक यशस्वी व्यावसायिक होण्याचा मान मिळवला आहे. श्रीकांत यांनी आफल्या अंधत्वाला कधीही यशाच्या मार्गावर अडथळा बनू दिले नाही. श्रीकांत आज यशस्वी कोट्यधीशांपैकी एक आहेत. त्यांची यशोगाथ सोशल मीडियावर व्हायरल होत असते.

श्रीकांत बोला यांचा परिचय...श्रीकांत यांचा जन्म 7 जुलै 1992 रोजी आंध्र प्रदेशच्या सीतारामपुरम येथे झाला. श्रीकांत जन्मापासून अंध आहेत. मुलगा झाल्यावर प्रत्येकाच्या घरात मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. पण, अतिशय गरीब कुटुंबात अंध श्रीकांत यांचा जन्म झाल्याने घरात निराशा पसरली होती. श्रीकांत यांच्या जन्मानंतर अनेकांनी त्यांच्या आई-वडिलांना टोकाचे सल्ले दिले होते. पण, सर्व गोष्टी झुगारुन श्रीकांत यांच्या पालकांनी त्यांचा चांगला सांभाळ करण्याचा निर्धार केला.

अंधत्व शिक्षणाच्या आड आलेबोला यांना लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती. त्यांना नेहमीच अभियंता बनण्याची इच्छा होती, पण त्यांचे अंधत्व शिक्षणाच्या आड येत होते. अंधत्वामुळे त्यांना अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. शैक्षणिक संस्थांकडून शिक्षणास नकार मिळाल्यामुळे श्रीकांत यांनी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात शिक्षणाचे नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी अपील केले. श्रीकांत यांनी खटला जिंकला आणि यानंतर राज्य मंडळ शाळेत शिक्षण घेत गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करत 98% गुण मिळवले. 

IIT आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलीबोला यांना IIT मध्ये दाखला घ्यायचा होता, पण त्यांना ते जमले नाही. यानंतर त्यांनी अमेरिकेतील सर्वोत्तम कॉलेजपैकी एक असलेल्या MIT मध्ये अर्ज केला आणि त्यांची निवडही झाली. भारतातील पहिला अंध विद्यार्थी आणि देशाबाहेरील पहिला अंध विद्यार्थी म्हणून बोला यांना एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. अंधत्वामुळे त्यांना अभ्यासात अनेक अडचणी आल्या, पण आपले शिक्षण पूर्ण केलेच. 

असा सुरू केला व्यवसाय2012 मध्ये भारतात परतल्यानंतर श्रीकांत यांनी बोलंट इंडस्ट्रीज सुरू केली. श्रीकांत बोला यांची कंपनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग वस्तू बनवते. आज त्यांनी आपला व्यवसाय इतका वाढवला की, त्यांचे नाव फोर्ब्सच्या 30 अंडर 30 यादीत आले. यानंतर श्रीकांत भारतातील तरुण उद्योजगांचे आदर्श बनले. श्रीकांत यांची कंपनी वर्षाला सूमारे शंभर कोटींची कमाई करते आणि शेकडो लोकांना रोजगारही देते. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसायगुंतवणूकपैसा