स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. ग्राहाकांना आता जास्त फायदा घेण्याची संधी आहे. यात तुम्ही दरमहा कमाई कराल. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागणार आहे.यातून प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळणार आहे.
एसबीआयच्या या योजनेचे नाव SBI Annuity Scheme असे आहे. या बँकेच्या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा १० हजार रुपये मिळू शकतात.नेमकी ही योजना काय आहे समजून घेऊया.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदर वाढणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने वेबसाइट दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत ३६, ६०, ८४ किंवा १२० महिन्यांसाठी ठेवी ठेवल्या जाऊ शकतात. तुम्ही ही योजना एसबीआयच्या सर्व शाखांमधून घेऊ शकता. सध्या कमाल ठेवीवर मर्यादा नाही. किमान वार्षिकी प्रति महिना १००० रुपये आहे.
यामध्ये युनिव्हर्सल पासबुकही ग्राहकांना देण्यात येणार आहे. कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो. यामध्ये खाते सिंगल किंवा जॉइंट दोन्ही पद्धतीने उघडता येते.
जर एखाद्याला या योजनेत दरमहा १० हजार रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर त्याला ५,०७,९६४ रुपये जमा करावे लागतील. या जमा केलेल्या रकमेवर, त्याला ७ टक्के व्याजदराचा परतावा मिळेल, ज्यातून गुंतवणूकदार दरमहा १० हजार रुपये कमवू शकतात.