Lokmat Money >गुंतवणूक > Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय

Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय

Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मूलभूत नियम म्हणजे दीर्घकालीन विचार करणे. यामुळे तुमची जोखीम शून्यापर्यंत येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:24 AM2024-10-08T11:24:13+5:302024-10-08T11:27:17+5:30

Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मूलभूत नियम म्हणजे दीर्घकालीन विचार करणे. यामुळे तुमची जोखीम शून्यापर्यंत येऊ शकते.

stock market investment safe ways tips to make money and reduce the risk | Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय

Stock Market मधील रिस्क कमी करायची आहे? मग 'हे' आहेत गुंतवणुकीचे सुरक्षित पर्याय

Stock Market :शेअर बाजारात पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. इथं माणूस काही मिनिटांत कोट्यधीश होऊ शकतो. मात्र, जोखीमही एवढी मोठी असते की रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका असा सल्ला देतात. मात्र, अभ्यास करुन जोखीम उचलली तर श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही. शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणुकीचे काही मार्ग आहेत. याचा वापर तुम्ही केला तर मार्केटमधील तेजीचा फायदा उचलण्यास मदत होईल.

गुंतवणुकीतील वैविध्य
शेअर बाजारातील गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्याचा चांगला पर्याय म्हणजे गुंतवणुकीत वैविध्य असणे. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवण्यापेक्षा तुमचा पैसा इक्विटीमध्ये किती असावा, डेब्टमध्ये किती, सोन्यात किती आणि लिक्विड मालमत्तेमध्ये किती असावा हे ठरवणे महत्त्वाचे आहे. यानंतर, तुम्ही लार्ज-कॅप आणि मिड-कॅप इक्विटीमध्ये किती गुंतवायचे, दीर्घ मुदतीच्या आणि कमी कालावधीच्या कर्जामध्ये किती गुंतवणूक करावी हे ठरवू शकता. त्याचा फायदा असा आहे की ते इक्विटी आणि डेब्ट यांच्यात आपोआप रीडिस्ट्रीब्यूट केले जाते.

उदाहरणार्थ, जर तुमचा इक्विटीचा आदर्श एक्स्पोजर ५५% असेल आणि बाजारातील रॅलीने इक्विटी शेअर ७०% वर नेला असेल, तर ऑटोमॅटिक रीडिस्ट्रीब्यूशन वेळ आली आहे असं समजा. यावेळी तुमच्या इक्विटीमधील एक्स्पोजर कमी करुन डेब्टचे एक्स्पोजर वाढवणे आवश्यक आहे. याचे दोन फायदे आहेत. नफ्याचा एक भाग उच्च बाजार स्तरांवर आपोआप काढून घेतला जातो आणि दुसरे म्हणजे, जेव्हा इक्विटी मार्केट अधिक आकर्षक पातळीवर येते तेव्हा तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी रोख रक्कम असते.

इक्विटी फंडांचा विचार करा
थेट इक्विटी खरेदी करताना अनेक आव्हाने आहेत. यासाठी स्टॉक मार्केट आणि विविध कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलबद्दल खूप समज आणि अभ्यास आवश्यक आहे. बहुतेक वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी हे खूप कठीण आणि वेळखाऊ असू शकते. दुसरे म्हणजे तुमचा कॉर्पस खूप मोठा असल्याशिवाय थेट इक्विटीमध्ये विविधता आणणे खूप कठीण आहे. वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड निवडणे हा एक चांगला दृष्टीकोन आहे. आजकाल म्युच्युअल फंड खूप लिक्विड आहेत.

सिस्टिमॅटिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक
तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करावी. इक्विटी म्युच्युअल फंड देखील पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक नसतात, कारण इक्विटीमध्ये जोखीम असते. जेव्हा तुम्ही एसआयपी निवडता तेव्हा तुम्ही नियमित छोट्या प्रमाणात गुंतवणूक करता. बाजारातील चढउतारांच्या बाबतीत हे तुमच्यासाठी चांगले काम करते. जेव्हा बाजार अस्थिर असतात तेव्हा हे सर्वोत्कृष्ट कार्य करते. कारण तुम्हाला थेट खरेदी करण्यापेक्षा चांगली सरासरी किंमत मिळते.

निष्क्रिय गुंतवणुकीमुळे स्टॉक्स निवडण्याच्या त्रासातून सुटका
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी असा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदारासमोर असतो. जर फंड मॅनेजर इंडेक्सला मागे टाकण्यासाठी धडपडत असेल तर तुम्ही इंडेक्स खरेदी करू शकता. तुम्ही इंडेक्स फंड आणि इंडेक्स ईटीएफमध्ये गुंतवणूक करून हे करू शकता. हे फंड निष्क्रीय फंड आहेत जे कालांतराने निर्देशांकासोबत चालतात.

दीर्घकालीन विचार करा
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मूलभूत नियम म्हणजे दीर्घकालीन विचार करणे. यामुळे ती सुरक्षित गुंतवणूक होत नाही. पण, त्यामुळे अशा गुंतवणुकीतील जोखीम बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. , एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, १-३ वर्षांच्या होल्डिंग कालावधीत, तोटा होण्याची शक्यता ४०% इतकी जास्त असू शकते. जर तुम्ही इक्विटी पोर्टफोलिओ ७ वर्षांहून अधिक काळ होल्डिंग केली असेल, तर तोटा होण्याची शक्यता ५% पेक्षा कमी होते. तुम्ही १० वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास तोट्याची संभाव्यता शून्याच्या जवळ जाते.
 

Web Title: stock market investment safe ways tips to make money and reduce the risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.