Join us  

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेत मोठे बदल! गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 3:58 PM

Sukanya Samriddhi Yojana : या विशेष योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलीला 21 वर्षानंतर लाखो रुपये मिळतील.

नवी दिल्ली : जर तुम्हीही मुलीचे वडील असाल आणि तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे व तिला कधीही पैशाची अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हीही सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. या विशेष योजनेत गुंतवणूक करून तुमच्या मुलीला 21 वर्षानंतर लाखो रुपये मिळतील. तुम्हाला फक्त या योजनेत दररोज 416 रुपये गुंतवायचे आहेत. हे 416 रुपये नंतर तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयांची मोठी रक्कम होईल. त्यामुळे तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही यामधून सहज निघेल.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही अशी दीर्घकालीन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल खात्री बाळगू शकता. यासाठी तुम्हाला खूप पैसे गुंतवण्याचीही गरज नाही. या योजनेत अनेक मोठे बदल होत आहेत. नवीन नियमांनुसार खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.  याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. पूर्वीचा नियम असा होता की, मुलगी 10 वर्षांनंतरच खाते ऑपरेट करू शकत होती. पण नवीन नियमांनुसार मुलीला 18 वर्षांच्या आधी खाते ऑपरेट करण्याची परवानगी मिळणार नाही. त्याआधी, फक्त पालक खाते ऑपरेट करतील.

आता 'तिसऱ्या' मुलीचेही खाते उघडता येणारयापूर्वी या योजनेत 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर मिळत होता. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींचे खाते उघडण्याची तरतूद आहे.

डिफॉल्ट खात्यावरील व्याजदर बदलणार नाहीया अंतर्गत खात्यात वर्षाला किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम जमा न केल्यास, खाते डिफॉल्ट मानले जाते. परंतु नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत, खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज जमा होत राहील. पूर्वी, डिफॉल्ट खाती पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज मिळविण्यासाठी वापरली जात होती.

मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते खाते सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेले खाते आधी दोन परिस्थितींमध्ये बंद केले जाऊ शकते. एक जर मुलगी मरण पावली आणि दुसरे म्हणजे जर मुलीच्या राहत्या घराचा पत्ता बदलला असेल. मात्र नव्या बदलानंतर खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय