Join us

सुकन्या समृद्धी योजना की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांच्या भविष्यासाठी कुठे मिळेल चांगला परतावा..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 3:56 PM

सुकन्या समृद्धी योजना आणि SBI मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड, या मुलांसाठी चांगल्या गुंतवणूक योजना आहेत.

Investment: सध्याच्या काळात सर्व गोष्टी खूप महागल्या आहेत. मुलांचे शिक्षण असो वा लग्न, सर्वच ठिकाणी भरमसाठ पैसा लागतोय. विशेषतः उच्च शिक्षणासाठी पालकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी बचत कशी करावी, या चिंतेत अनेक पालक असतात. यातच अनेकजण खूप आधीपासून गुंतवणूक सुरू करतात, पण त्यावर मिळणारा परताना आता खूप कमी झाला आहे. अशा स्थितीत मुभलक प्रमाणात पैसा उभा राहत नाही.

आर्थिक सल्लागार सांगतात की, लोकांनी कुठेही गुंतवणूक करण्यापेक्षा योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. आम्ही तुम्हाला दोन अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात चांगले रिटर्न्स मिळू शकतील. या योजना म्हणजे, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंड (SBI Magnum Children's Benifit Fund). या दोन्ही योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो.

सुकन्या समृद्धी योजनासुकन्या समृद्धी योजना योजनेची सुरुवात अर्थ मंत्रालयाने 2019मध्ये केली होती. ही मुलींसाठी एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. ही योजना पोस्ट ऑफीस किंवा सरकारी बँकांमध्ये उपलब्ध आहे. सरकार या योजनेवर 7.6 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तुमच्या मुलीचे वय 10 वर्षे असेल, तर तिच्या नावाने ही योजना सुरू करता येते. या योजनेतील रकमेवर आणि मिळणार्या व्याजावर टॅक्समध्ये मोठी सूट मिळते.

SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंडSBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट फंडची सुरुवात 2002मध्ये झाली होती. यात गुंतवणुकदारांना दोन पर्याय मिळतात. एक सेव्हिंग प्लॅन आणि दुसरा इनव्हेस्टमेंट प्लॅन. मुलांसाठी लॉन्ग टर्म इनव्हेस्टमेंट म्हणून हा प्लॅन लॉन्च केला आहे. SBI मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफीट, ही एक कन्झर्व्हेटीव्ह हायब्रिड फंड आहे. यात डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते. या योजनेच्या सुरुवातीला 10 टक्के परताना दिला जातो. जानकारांच्या मते या फंडने गेल्या एका वर्षात 5.3 टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या तीन वर्षात 12 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

डिस्क्लेमर- आम्ही या दोन्ही योजनांची माहिती दिली आहे, योग्यप्रकारे विचार करुनच गुंतवणूक करावी.

टॅग्स :गुंतवणूकव्यवसायएसबीआय