Lokmat Money >गुंतवणूक > Tata-Bisleri Deal : बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार...

Tata-Bisleri Deal : बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार...

Tata-Bisleri Deal: भारतात बाटलीबंद पाण्याचा उद्योग 20 हजार कोटींचा आहे. यात बिस्लेरीचा सर्वात मोठा वाटा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 01:41 PM2023-03-23T13:41:57+5:302023-03-23T13:42:48+5:30

Tata-Bisleri Deal: भारतात बाटलीबंद पाण्याचा उद्योग 20 हजार कोटींचा आहे. यात बिस्लेरीचा सर्वात मोठा वाटा आहे.

Tata-Bisleri Deal: No deal with Bisleri, but Tata got a new idea; Big plan ready | Tata-Bisleri Deal : बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार...

Tata-Bisleri Deal : बिस्लेरीसोबत करार झाला नाही, पण टाटाला मिळाली नवी आयडिया; मोठी योजना तयार...

Tata-Bisleri Deal: काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर बिस्लेरी(Bisleri) टाटा ग्रुपकडे जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, नंतर त्यांच्यातला करार रद्द झाला. बिस्लेरी आता चौहान कुटुंबाकडेच राहणार असली तरीदेखील या सर्व प्रोसेसदरम्यान टाटा समुहाला नवीन आयडिया मिळाली आहे. आता टाटाने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसाठी नवीन योजना आखली आहे.

रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुपकडे स्वतःचे दोन लोकप्रिय ब्रँड Tata Copper+ आणि Himalayan आहेत. आता टाटा ग्रुप या दोन ग्रुपवर जास्त लक्ष देणार आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसोझा यांनी सांगितल्यानुसार, कंपनीकडे एनर्जी वॉटर सेगमेंटमध्ये Tata Gluco+ सारखाही एक लोकप्रिय ब्रँड आहे.

Tata Copper+ 400 कोटींचा ब्रँड
टाटा ग्रुपचा पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर ब्रँड टाटा कॉपर प्लस 400 कोटी रुपयांचा आहे. तसेच, कंपनीचा मिनरल वॉटर ब्रँड हिमालयन आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान ब्रेक इव्हन पॉइंटवर पोहोचला आहे. टाटा ग्रुपने मुंबई, बंगळुरू आणि श्री सिटीमध्ये फूड अँड बेवरेजेस सेगमेंटचा उद्योग वाढवण्यासाठी स्वतःची रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटी तयार केली आहे.

बिस्लेरीमुळे 3 वर्षे पुढे पोहचलो असतो...
सुनील डिसोझाने सांगितले की, बिस्लेरीच्या अधिग्रहणानंतर टाटा ग्रुपचा फूड अँड ब्रेवरेजेस व्यवसाय एक झटक्यात तीन वर्षे पुढे गेला असता. पण, हा आमच्या खूप मोठ्या योजनेचा छोटासा भाग होता. आता आम्ही टाटा कॉपर प्लस, टाटा ग्लूको प्लस आणि हिमालयन मिनरल वॉटरसारख्या आमच्या ब्रँडवर फोकस करणार आहोत.
 

Web Title: Tata-Bisleri Deal: No deal with Bisleri, but Tata got a new idea; Big plan ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.