Lokmat Money >गुंतवणूक > ५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: April 16, 2025 13:58 IST2025-04-16T13:55:25+5:302025-04-16T13:58:01+5:30

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर

The dream of reaching 55 thousand was shattered Gold price increased by more than 1300 rupees in a day 16 april 2025 what is the new price | ५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव ९४,४८९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. एका झटक्यात सोन्याच्या दरात १३८७ रुपयांची वाढ झाली. तर चांदी ३७३ रुपयांनी महाग होऊन ९५,४०३ रुपये झाली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ९७,३२३ रुपये आणि चांदीचा भाव ९८,२६५ रुपये झाला आहे.

या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १८,७४९ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी ९३८६ रुपये प्रति किलोनं महागली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही

आयबीजेएने जाहीर केलेल्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव आता १३८२ रुपयांनी महागला असून तो ९४,१११ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १२७१ रुपयांनी वाढून ८६,५५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १०४० रुपयांनी वाढून ७०,८६७ रुपये झाला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

किंमती का वाढत आहेत?

कमकुवत डॉलर आणि जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमतींनी हा विक्रमी उच्चांक गाठला. कॉमेक्स सोन्याचा भाव २ टक्क्यांनी वधारून ३,२९४.६० डॉलर प्रति औंस झाला. आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. भारतातील महागाईत मोठी घसरण झाल्यानंतर व्याजदर कपातीच्या वाढत्या अपेक्षा आणि अमेरिकेतील सोन्याच्या किमतींनाही आधार मिळत आहे.

Web Title: The dream of reaching 55 thousand was shattered Gold price increased by more than 1300 rupees in a day 16 april 2025 what is the new price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.