Lokmat Money >गुंतवणूक > सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानलं जातं. पाहूया यावर कोणते फायदे मिळतायत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:03 AM2023-11-27T11:03:03+5:302023-11-27T11:03:21+5:30

सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानलं जातं. पाहूया यावर कोणते फायदे मिळतायत.

There are many benefits available on government savings schemes check the complete list before investing know benefits | सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

Small Saving Schemes: सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानलं जातं. लहान बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचा समावेश होतो. या योजना सर्व वर्गातील लोकांसाठी आहेत, ज्यात कर लाभांपासून ते हमीपरताव्यापर्यंत अनेक फायदे मिळतात. अधिकाधिक लोकांना या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. याचे अनेक फायदे आहेत, चला जाणून घेऊया कोणते आहेत स्मॉल सेव्हिंग स्कीमचे फायदे.

गॅरंटीड रिटर्न
स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचा समावेश होतो. या सर्व योजना हमखास परतावा देतात. यामध्ये तुम्हाला या कालावधीत किती रक्कम मिळेल याची कल्पना असते.

फायनान्शिअल इंडिपेंडंन्स आणि स्टॅबिलिटी
जर तुम्ही या स्मॉल स्कीम्समध्ये गुंतवणूक केली असेल तर ते तुमच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी फायनान्शिअल इंडिपेंडंन्स आणि स्टॅबिलिटी देतं. स्मॉल सेव्हिंग स्कीम्स सुरक्षित आणि रेग्युलर इन्कम आणि उत्तम आर्थिक रणनितीच्या आधारे काम करतं.

इन्कम टॅक्समध्ये सूट
स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये इन्कम टॅक्स सूट मिळते. तुम्ही ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. पीपीएफ, सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम, टाईम डिपॉझिट आणि एफडीसारख्या योजनांमध्ये कर सूटीचा लाभ मिळतो.

किमान गुंतवणूक
गुंतवणूकदारांना यात किमान गुंतवणूक करावी लागते. स्मॉल सेव्हिंग स्कीम्सच्या आधारे ही रक्कम २५० ते १००० रुपयांपर्यंतही असू शकते. तुम्ही या योजनांत छोटी रक्कमही गुंतवू शकता.

उत्पन्नाचा भरवसा
आजच्या काळात जेव्हा लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांसारख्या जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करतायत, त्याच वेळ स्मॉल सेव्हिंग स्कीम्स उत्पन्नाची हमी देतात. एका निश्चित व्याजासह तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल याची तुम्हाला कल्पना असते. याचाच अर्थ भविष्यात तुम्हाला निश्चितच रक्कम मिळते.

 

Web Title: There are many benefits available on government savings schemes check the complete list before investing know benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.