अनेकदा गृहिणी मोठ्या प्रमाणात बचत करत असतात. बचतीतील काही रक्कम योग्य पर्यायामध्ये गुंतवून त्याचा गृहिणींना फायदा होऊ शकतो. यामुळे विनाकारण होणारा खर्च थांबू शकेल आणि मोठा फंड निर्माण होण्यास मदत होईल. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, एसआयपी आणि रिकरिंग डिपॉझिट अशा योजनांमध्ये गुंतवणूक करुन मोठा निधी जमा करता येऊ शकतो. तुम्ही आरडी आणि एसआयपीमध्ये दरमहा थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमहिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेअंतर्गत उघडलेले खाते किमान १००० रुपयांपासून सुरू होते. यामध्ये जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. सध्या पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यात जमा केलेल्या पैशावर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे.
एसआयपी म्युच्युअल फंडम्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय अतिशय चांगला आहे. याद्वारे महिला केवळ ५०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुमच्याकडे काही वर्षांत मोठा निधी तयार होऊ शकतो. तुम्ही दीर्घ मुदतीसाठी एसआयपीमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये सरासरी परतावा १२ टक्क्यांपर्यंत मिळतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
रिकरिंग डिपॉझिटतुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडीमध्ये दरमहा एक छोटी रक्कम जमा करू शकता. दरमहा छोट्या बचतीतून मोठा निधी तयार करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. गृहिणी दरमहा काही रक्कम यामध्ये गुंतवू शकतात. तुम्ही दरमहा केवळ १०० रुपये यात गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये सध्या यावर ६.५ टक्के व्याज दिलं जात आहे. एसबीआय बँक यावर ७ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)