Join us

पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये FD पेक्षा जास्त व्याजदर; आयकरातूनही मिळत सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 2:16 PM

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही बँकांच्या एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळू शकतो.

Post Office : गेल्या काही वर्षात पोस्ट ऑफिस बचत योजना लहान गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. यामागचे कारण म्हणजे या योजनांमध्ये कुठल्याही जोखमीशिवाय बँकांपेक्षा जास्त परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस बचत योजनमध्ये गुंतवणूकदारांना ८.२% पर्यंत व्याजदराचा लाभ मिळतो. यापैकी बहुतेक पोस्ट ऑफिस योजना आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत आयकर सूट देतात. आज आपण अशाच ५ पोस्ट ऑफिस बचत योजनांबद्दल माहिती घेऊ.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)ज्येष्ठ नागरिक बचत योजना भारत सरकार समर्थित आहे. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवता येते. वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे खाते उघडता येते. यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला आयकरातून सूट मिळते. या योजनेत वार्षिक ८.२ टक्के व्याजदर मिळतो.

किसान विकास पत्रकिसान विकास पत्र हे भारत सरकारने जारी केलेले बचत प्रमाणपत्र आहे. ही योजना निश्चित व्याज दर आणि हमी परतावा देते. मात्र, यामध्ये गुंतवणुकीवर आयकर सवलत नाही. या योजनेत ७.५% वार्षिक चक्रवाढ मिळते. (गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत किंवा 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होते).

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (MIS)पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न मिळविण्याची संधी देते. एखादी व्यक्ती किमान १,५०० आणि कमाल ९ लाख गुंतवू शकते. तर संयुक्त खात्यांसाठी कमाल मर्यादा १५ लाख आहे. व्याज करपात्र असून कलम ८०C अंतर्गत सूट मिळत नाही. व्याज दर : ७.४% प्रतिवर्ष (मासिक देय).

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही संपूर्ण भांडवली संरक्षणासह हमी दिलेली गुंतवणूक आणि बचत योजना आहे. कोणतीही व्यक्ती एकच खाते उघडू शकते तर तीन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. एक पालक अल्पवयीन किंवा आजारी व्यक्तीच्या वतीने NSC खाते देखील चालवू शकतो. व्याज दर : ७.७% वार्षिक चक्रवाढ.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रमहिला सन्मान बचत प्रमाणपत्र हा सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतीय महिलांमध्ये बचतीची संस्कृती वाढवणे आहे. या योजनेत कोणतीही कर सूट मिळत नाही. व्यक्तीच्या उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून कर वजा केला जातो. या योजनेत ७.५ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ केले जाते. 

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकबँकिंग क्षेत्र