Join us  

Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 5:06 PM

Post Office Schemes : या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो.

Post Office Schemes : जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसच्या 4 जबरदस्त योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. या यादीमध्ये पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), रिकरिंग डिपॉझिट (RD), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि टाईम डिपॉझिट (TD) योजनांचा समावेश आहे. या योजनांद्वारे गुंतवणूकदार काही वर्षांत मोठा निधी तयार करू शकतात, त्यासोबतच आपल्या गरजाही पूर्ण करू शकतात.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूकदार वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. त्याच वेळी, तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 12,500 रुपये महिन्याला जमा करू शकता. या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे, जी तुम्ही 5-5 वर्षांपर्यंत तुम्हाला वाढवता येतात. या योजनेत वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. जर तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले आणि 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 37,50,000 रुपये होईल. 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम 1.03 कोटी रुपये असेल कारण तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळेल.

रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) रिकरिंग डिपॉझिटमध्ये, तुम्ही महिन्याला कोणतीही रक्कम जमा करू शकता. यामध्ये कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. येथे जर तुम्ही दरमहा 12500 पीपीएफ प्रमाणे गुंतवले तर तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो. तुम्ही RD मध्ये कितीही वर्षे गुंतवणूक करू शकता. यामध्ये वार्षिक 5.8 टक्के चक्रवाढ व्याज मिळते. तुम्ही जमा 1,50,000 रुपये केल्यास चक्रवाढ व्याजाच्या हिशोबाने 27 वर्षांनंतर तुमची रक्कम सुमारे 99 लाख रुपये होईल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 40,50,000 लाख रुपये असेल.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate)तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक केल्यास, आयकर कलम 80C अंतर्गत NSC मध्ये प्रति वर्ष 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून तुम्हाला कर सूट मिळू शकते. यामध्ये मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा असतो. यामध्ये वार्षिक 6.7 टक्के दराने व्याज मिळत आहे. व्याजदराबद्दल बोलायचे झाल्यास, इतर लहान बचत योजनांमध्ये, व्याज दराचे दर तिमाहीत पुनरावलोकन केले जाते. परंतु NSC मध्ये गुंतवणूक करताना, व्याज दर संपूर्ण परिपक्वता कालावधीसाठी समान राहतो.

टाइम डिपॉजिट (Time Deposit)टाइम डिपॉझिट अर्थात FD मध्ये ठेवीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अंतर्गत, 5 वर्षांच्या ठेवीवर वार्षिक 6.7 टक्के व्याज उपलब्ध आहे. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवून चांगली कमाई करू शकता. कारण त्यावर 6.7 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो, तर तुम्ही 30 वर्षांत कोट्यधीश होऊ शकता.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकपैसा