Join us

हे संकल्प तुमच्या आयुष्याला उजळवून टाकतील...चला जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 7:51 AM

जर तुम्हाला जीवनातील संपत्तीचे महत्त्व समजले असेल, तर वर्षातून फक्त एक दिवस लक्ष्मीची पूजा करणे पुरेसे नाही.

- चंद्रकांत दडस

जर तुम्हाला जीवनातील संपत्तीचे महत्त्व समजले असेल, तर वर्षातून फक्त एक दिवस लक्ष्मीची पूजा करणे पुरेसे नाही. यासाठी तुम्ही काही आर्थिक संकल्प करावेत, ज्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होईल. असे कोणते आर्थिक संकल्प आहेत, ज्याने तुमचे आर्थिक आयुष्य उजळून निघेल, चला जाणून घेऊ...

बजेट बनवा आणि खर्च कराज्या खर्चाचा तुम्हाला पहिल्यापासूनच अंदाज आहे त्यासाठी बजेट बनविण्याची सवय लावा. बजेट बनविण्याची आणि हिशेब ठेवण्याची सवय जुन्या पद्धतीची वाटेल, पण ही जुनी सवय आजही तितकीच फायदेशीर आहे. खर्च करण्याआधी जर तुम्ही बजेट बनवून त्याची अंमलबजावणी केली तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो.

महागडे खर्च टाळामहागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय काही काळासाठी थांबवा. कोणत्याही गोष्टीवर मोठी रक्कम खर्च करण्यापूर्वी किमान एक महिन्याचा वेळ घ्या. गाडी बदलण्यापूर्वी, किचन मेकओव्हर किंवा असा कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी स्वत:ला थांबवा. तो खर्च खरोखरच आवश्यक असेल तर महिनाभरानंतरही तो तितकाच आवश्यक राहील. तुम्हाला हे विचार करून आश्चर्य वाटेल की, एका महिन्यानंतर यातील अनेक खर्च तुमच्यासाठी पूर्वीसारखे महत्त्वाचे वाटत नाहीत.

थोडी थोडी गुंतवणूक करातुमच्याकडे जो काही अधिकचा पैसा आहे तो तो गुंतवण्याची सवय लावा. तुमच्या पगाराच्या तारखेच्या एक दिवस आधी तुमचे बँक खाते तपासा. दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवा. या नियमित गुंतवणुकीसाठी आरडी किंवा एसआयपी हा पर्यायही वापरता येईल. अशी नियमित गुंतवणूक दीर्घकाळात तुमच्यासाठी मोठी संपत्ती निर्माण करणारी ठरू शकते.

टॅग्स :गुंतवणूक