Join us  

‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 6:27 AM

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  टेस्ला नव्हे तर ‘बीवायडी’ ही चीनमधील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात प्रवेश करणार आहे. कंपनीने भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनी सुमारे ८ हजार २०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

‘बीवायडी’ने हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीसाेबत भागीदारी केली आहे. कंपनीच्या सहयाेगाने इलेक्ट्रिक कार व बॅटरी उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. कंपनी तेलंगणामध्ये कारखाना उभारणार आहे. यासाठी १५० एकर जमीन यापूर्वीच संपादित  केलेली आहे.  ‘बीवायडी’चा प्रकल्प मंजूर झाल्यास आणखी जमिनीची मागणी करण्यात येईल.

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार

या गाड्या आणणार‘बीवायडी’ हॅचबॅकपासून लक्झरी कारची संपूर्ण श्रेणी भारतात लाॅंच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत काेणतीही टिप्पणी केलेली नाही. 

टॅग्स :कारचीनहैदराबाद