Lokmat Money >गुंतवणूक > जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, ₹२१० रुपयांची गुंतवणूक; मिळेल ₹५००० ची पेन्शन

जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, ₹२१० रुपयांची गुंतवणूक; मिळेल ₹५००० ची पेन्शन

सरकार लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. या योजनेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेन्शन स्कीम निवडू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:12 AM2023-10-16T11:12:31+5:302023-10-16T11:14:10+5:30

सरकार लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. या योजनेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेन्शन स्कीम निवडू शकता.

This government scheme is awesome an investment of rs 210 You will get a pension of 5000 know atal pension scheme details | जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, ₹२१० रुपयांची गुंतवणूक; मिळेल ₹५००० ची पेन्शन

जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, ₹२१० रुपयांची गुंतवणूक; मिळेल ₹५००० ची पेन्शन

Atal Pension Yojana: सरकार लोकांच्या सोयीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. अशीच एक योजना (Atal Pension Yojana) म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेन्शन स्कीम निवडू शकता. जर तुम्ही या योजनेत दरमहा २१० रुपये गुंतवले तर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा ५ हजार रुपयांची पेन्शन मिळेल.

२०१५-१६ मध्ये अटल पेन्शन योजनेची सुरूवात करण्यात आली होती. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलीये. अटल पेन्शन योजना अटल पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) चालवली जाते.

कोण करू शकतं गुंतवणूक?
१८ ते ४० वर्षे वयाचे सर्व नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. परंतु ऑक्टोबर २०२२ पासून यात बदल करण्यात आलेत. जे लोक इन्कम टॅक्स देत नाहीत, त्यांनाच यात गुंतवणूकीची परवानगी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत यात गुंतवणूक करणाऱ्याला ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या योगदानाच्या आधारे महिन्याला १००० ते ५००० रुपयांपर्यंतची हमी दिली जाते. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास ही पेन्शनची रक्कम त्याच्या जोडीदाराला दिली जाते.

५ हजारांचं पेन्शन
कमी पैसे गुंतवून पेन्शनची हमी देण्यासाठी अटल पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत, खात्यात दर महिन्याला निश्चित योगदान दिल्यानंतर, तुम्हाला १ हजार ते ५ हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. सध्याच्या नियमांनुसार, १८ व्या वर्षी यात गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला ५ हजार रुपये मासिक पेन्शसाठी महिन्याला २१० रुपेय द्यावे लागतील. 
जर हीच रक्कम तुम्ही ३ महिन्यांनी दिली तर तुम्हाला ६२६ रुपये भरावे लागतील. तर सहा महिन्यांसाठी ही रक्कम १२३९ रुपये असेल. दरमहा १ हजार रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला ४२ रुपये द्यावे लागतील.

 

Web Title: This government scheme is awesome an investment of rs 210 You will get a pension of 5000 know atal pension scheme details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.