Lokmat Money >गुंतवणूक > SIP मध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करुन होऊ शकता कोट्यधीश, केवळ व्याजातूनच मिळू शकतात ₹१,५४,७६,९०७

SIP मध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करुन होऊ शकता कोट्यधीश, केवळ व्याजातूनच मिळू शकतात ₹१,५४,७६,९०७

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळात एसआयपीनं गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:05 AM2024-01-06T10:05:33+5:302024-01-06T10:05:49+5:30

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दीर्घकाळात एसआयपीनं गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला आहे.

This is how you can become a millionaire by investing in SIP earning rs 15476907 only from interest know details investment | SIP मध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करुन होऊ शकता कोट्यधीश, केवळ व्याजातूनच मिळू शकतात ₹१,५४,७६,९०७

SIP मध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करुन होऊ शकता कोट्यधीश, केवळ व्याजातूनच मिळू शकतात ₹१,५४,७६,९०७

अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड एसआयपीमधील (Mutual Funds SIP)  गुंतवणूक झपाट्यानं वाढली आहे. दीर्घकाळात एसआयपीनं गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला आहे. तुम्ही एसआयपीमध्ये दीर्घकाळात शिस्तबद्ध आणि सतत गुंतवणूक केल्यास, तुम्ही काही वर्षात कोट्यधीश होऊ शकता. तुम्ही एसआयपीमध्ये अगदी 500 रुपयांपासून मासिक गुंतवणूक सुरू करू शकता.

या व्यतिरिक्त, तुम्हाला एसआयपीमध्ये फ्लेक्सिबिलिटीदेखील मिळते म्हणजेच तुम्ही कधीही रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास, तुम्ही ती थांबवू शकता आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर तेथून पुन्हा सुरुवात करू शकता. तसंच, तुम्ही ते बंद करून कधीही पैसे काढू शकता. पण जर तुम्हाला एसआयपीद्वारे लवकरात लवकर कोट्यधीश व्हायचं असेल तर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खास धोरण अवलंबावं लागेल. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.

हा फॉर्म्युला तेजीनं वाढवेल पैसा

जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये एसआयद्वारे पैसे गुंतवायचे असतील, तर सर्वप्रथम तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 20 ते 25 वर्षांसाठी एक एसआयपी सुरू करा. या एसआयपीमध्ये तुम्ही दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवत रहा. उदाहरणार्थ- जर तुम्ही 5000 रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर गुंतवणुकीची रक्कम पुढच्या वर्षी 500 रुपयांनी वाढवून 5500 रुपये करा, त्यानंतरच्या वर्षी ती आणखी 10 टक्के वाढवून ती 5550 करा. अशा प्रकारे, SIP गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी 10 टक्के वाढवत ठेवा आणि ती 20 ते 25 वर्षे चालू ठेवा.

कसे बनाल कोट्यधीश?

आर्थिक तज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घकाळात, एसआयपी सरासरी 12 टक्के परतावा देते. कधीकधी आपण यापेक्षा जास्त मिळवू शकता. जर तुम्ही एसआयपीमध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि या गुंतवणुकीत दरवर्षी 10 टक्के वाढ करत राहिल्यास. अशा प्रकारे तुम्ही 21 वर्षात कोट्यधीश होऊ शकता. अशा स्थितीत तुमची 21 वर्षांची एकूण गुंतवणूक 38,40,150 रुपये होईल, परंतु तुम्हाला 12 टक्के दरानं व्याज म्हणून 77,96,275 रुपये मिळतील. 21 वर्षांनंतर तुम्ही 1,16,36,425 रुपयांचे मालक व्हाल.

जर तुम्ही ही गुंतवणूक 25 वर्षे सतत चालू ठेवली तर एकूण गुंतवणूक 59,00,824 रुपये होईल आणि तुम्हाला 1,54,76,907 रुपये 25 वर्षांत व्याज म्हणून मिळतील. अशा स्थितीत 25 वर्षांनंतर तुम्ही एकूण 2,13,77,731 रुपयांचे मालक व्हाल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: This is how you can become a millionaire by investing in SIP earning rs 15476907 only from interest know details investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.