जेव्हा जेव्हा कर बचतीसह गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा लोक अनेकदा कर बचत मुदत ठेवीच्या (FD) पर्यायाचा विचार करतात. गेल्या ११ महिन्यांत मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे एफडीमध्ये लोकांचा रस वाढला आहे. दरम्यान, तुमचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही अधिक व्याजासाठी विशेष पोस्ट ऑफिसची ही स्कीम देखील विचारात घेऊ शकता. या स्कीमचं नाव नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे. यामध्ये तुम्हाला मुदत ठेवींपेक्षा अधिक व्याज मिळते.
जर ५० हजारांपर्यंत पेन्शन हवं असेल तर या योजनेत करा गुंतवणूक, जाणून घ्या डिटेल्स
सरकारनं २०२३ च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी नॅशनल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरात ७० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. गेल्या तिमाहीत, नॅशनल सेव्हिंग स्कीमवर ७ टक्के व्याज देण्यात येत होते. नुकत्याच झालेल्या वाढीनंतर, नॅशनल सेव्हिंग स्कीमवरील व्याज ७.७ टक्क्यांपर्यंत वाढलंय. याशिवाय ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेवीवर ७.५ टक्के व्याज दिलं जात आहे.
बँकांकडून एफडीवर ७ टक्के व्याज
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक, अॅक्सिस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यासारख्या सर्वाधिक लोकप्रिय बँका कर-बचत मुदत ठेवींवर ७ टक्के व्याज देत आहेत. डीसीबी बँक ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक ७.६ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, इंडसइंड बँक त्याच कालावधीच्या मुदत ठेवींवर ७.२५ टक्के व्याज दर देखील देऊ करत आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार बँक ऑफ बडोदा ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.५ टक्के, कॅनरा बँक ६.७ टक्के, पंजाब नॅशनल बँक (PNB) ६.५ टक्के आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ६.५ टक्के व्याज देत आहे.
यावर ठेवा नीट लक्ष
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम आहे. यामध्ये किमान १००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. तसंच कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. याचा ५ वर्षांचा लॉक इन पीरिअड आहे. यात व्याज वार्षिक कंपाऊंडिंग पद्धतीनं मिळतं. तर एफडीवरील व्याजदर कंपाऊंडींग तिमाही आधारावर असते, जे थोडे अधिक ॲन्युअ यील्ड देते. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये तुम्ही केवळ तीन लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
(टीप - यामध्ये केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)