Umang App For PF Withdrawal: ईपीएफओ (EPFO) मेंबर्स आता घर बसल्या मोबाईलद्वारे आपल्या PF खात्यातून पैसे काढू शकतात. UMANG अॅपद्वारे किंवा EPFO सदस्य पोर्टलद्वारे ऑनलाइन ट्रांझॅक्शन, अॅडव्हान्स आणि पेन्शनचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी ई-नॉमिनेशन करणे आवश्यक आहे. EPFO सेवांमध्ये प्रवेश करण्याचा UMANG अॅप अतिशय सोयीचा मार्ग मानला जातो. EPFO मेंबर्स उमंग अॅप वापरून मोबाईल फोनद्वारे त्यांचे पीएफ खाते ट्रॅक करू शकतात.
UMANG अॅपवर EPFO सेवांसाठी या स्टेप्स फॉलो करा
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.अॅप उघडा आणि तुमच्या आधार क्रमांकासह पासवर्ड टाकून साइन इन करा.लॉग इन केल्यानंतर सेवांच्या सूचीमधून 'EPFO सेवा' निवडा.तुम्हाला वापरायच्या असलेल्या EPFO सेवेचा प्रकार निवडा.व्यवहार पूर्ण करण्यासाठी समोर दिलेल्या सूचनांचे पालन करा.
PF फमधून पैसे काढण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराUMANG अॅप उघडा आणि तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.आता सेवांच्या सूचीमधून 'EPFO सेवा' निवडा.त्यानंतर 'रेझ क्लेम' हा पर्याय निवडा.तुमचा UAN नंबर आणि OTP टाका. आवश्यक तपशील टाका आणि रिक्वेस्ट सबमिट करा.तुमच्या विनंतीसाठी तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल.
या EPFO सेवा तुम्ही उमंग अॅपवर वापरता येतीलPF शिल्लक तपासू शकता.क्लेमसाठी दावा करू शकता.KYC तपशील अपडेट करू शकता.पासबुक तपासू शकता.जीवन प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते.पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) डाउनलोड करू शकता.तक्रारी नोंदवू शकतात आणि ट्रॅक करू शकतात.