तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD) गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आता एका उत्तम संधीचा लाभ घेऊ शकता. इंडियन बँक आणि आयडीबीआय बँक या दोन प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ऑफर केलेल्या विशेष एफडी योजना 31 ऑक्टोबर रोजी नवीन गुंतवणुकीसाठी बंद होतील. या विशेष एफडी सामान्य कालावधीच्या तुलनेत अधिक आकर्षक व्याजदर देत आहेत.
इंडियन बँकेच्या विशेष एफडीचे नाव इंड सुपर आहे. या अंतर्गत 300 दिवस आणि 400 दिवसांच्या FD वर बंपर ऑफर उपलब्ध आहेत. याशिवाय आयडीबीआय बँकेच्या विशेष एफडीचे नाव अमृत महोत्सव एफडी आहे. या अंतर्गत 375 दिवस आणि 444 दिवसांपर्यंतच्या एफडीवर उत्तम व्याज दिलं जात आहे.
आयडीबीआय स्कीम
आयडीबीआय बँक 375 आणि 444 दिवसांच्या दोन विशेष FD स्कीम्स ऑफर करत आहे. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. “अमृत महोत्सव एफडी योजना” म्हणून ओळखल्या जाणार्या 375 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांसाठी 7.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी यावर 7.60 टक्के व्याज दिलं जातंय. याशिवाय, 444 दिवसांच्या FD योजनेच्या बाबतीत, सामान्य ग्राहक यावर 7.15 टक्के व्याजदराचा लाभ घेऊ शकतात, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याजदर दिला जातोय.
इंडियन बँक एफडी
इंडियन बँकेची विशेष एफडी योजना, "इंड सुपर 400 डेज एफडी योजना" म्हणून ओळखली जाते. या योजनेत तुम्ही 10,000 ते 2 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. या कालावधीत, बँक सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के जास्त व्याजदर देत आहे. अति ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ठेवींवर 8.00 टक्के उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.