Join us

दिवाळीत विमान प्रवास होणार स्वस्त! तिकीटाची किंमत फक्त १४९९ रुपये, 'या' दिवशी करा बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 5:23 PM

दिवाळी निमित्त आता विमान प्रवास स्वस्त होणार आहे. १४९९ रुपयांत आपल्याला देशांतर्गत कुठेही प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली: दिवाळी निमित्त आता विमान प्रवास स्वस्त होणार आहे. १४९९ रुपयांत आपल्याला देशांतर्गत प्रवास करता येणार आहे. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्या मालकीची असणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सने ही धमाकेदार ऑफर दिली आहे. 

एअरलाइनने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर उत्सव सेलची घोषणा केली आहे. तिकीट बुकिंगसाठी, हा सेल इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस या तिन्ही ट्रॅव्हल क्लासमध्ये उपलब्ध असणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी १४९९ रुपयांपासून तिकिटांची किंमत सुरू आहे.

देशांतर्गत प्रवास

विस्ताराने दिलेल्या माहितीनुसार, फेस्टीव्ह सेल अंतर्गत देशांतर्गत प्रवासासाठी तिकीट बुकिंग १७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत करु शकता. या दरम्यान बुकिंग करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. इकॉनॉमी क्लासचे भाडे देशांतर्गत प्रवासासाठी १,४९९ रुपये, प्रीमियम इकॉनॉमीसाठी २,९९९ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ८,९९९ रुपये आहे. 

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! एकाच ठिकाणी मिळणार बी-बियाणे, खते आणि माती परीक्षणाची सुविधा

आंतरराष्ट्रीय प्रवास

आंतरराष्ट्रीय प्रवासात इकॉनॉमी क्लाससाठी रिटर्न तिकिटाची किंमत १४,१४९ रुपयांपासून सुरू होते. प्रीमियम इकॉनॉमीसाठी १८,४९९ रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ४२,४९९ रुपयांपासून तिकिटांच्या किंमती सुरू होतात. आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकीट बुकिंगसाठी ४ दिवसांचा अवधी दिला आहे. १७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत तिकीट बुक करू शकता. यात तुम्ही २३ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता.

या स्कीम संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हिती दिली. 'सणांचा हंगाम आनंददायी आठवणी निर्माण करण्याचा असतो, प्रवास आणि सुट्ट्यांचे नियोजन करणे हा एक उत्तम मार्ग आहे. हवाई प्रवासाच्या मागणीत अलीकडची वाढ खूपच उत्साहवर्धक आहे. आमच्या ग्राहकांना सवलतीच्या दरात भारतातील सर्वोत्तम विमान कंपनीसोबत प्रवास करण्याची संधी देताना आम्हाला आनंद होत आहे, असं विस्ताराचे चीफ कमर्शियल ऑफिसर दीपक राजावत म्हणाले. 

टॅग्स :विमान