डिजिटल करन्सी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म आल्यानंतर सोन्यात गुंतवणूक करणं हे आता फक्त सोन्याची नाणी, सोन्याचा बार किंवा दागिने इथपर्यंतच मर्यादित राहिलं नाही. आज हे मौल्यवान असलेलं सोनं डिजिटल सोनं, गोल्ड ईटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉन्डसारख्या अनेक स्वरूपात खरेदी केला जाऊ शकतो. या दिवाळीत, तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणायचं असेल किंवा सोन्याची (Diwali gold gift) भेट देऊन सण साजरा करायचा असेल, तर हे विविध गुंतवणूकीचे पर्याय समजून घ्या आणि गुंतवणुकीचा पर्याय निवडा.
फिजिकल गोल्ड
दागिने किंवा सोन्याची नाणी यासारखे भौतिक सोने खरेदी करणे हा भारतातील लोकप्रिय पर्याय आहे. तुम्ही सोन्याचा बार, नाणी किंवा दागिन्यांमधून प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमचा स्वतःचा सोन्याचा साठा तयार होतो. ही पद्धत सोन्याचे दागिने घालण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार हाताळण्याचा पर्याय देतात. परंतु चोरीचा धोका नेहमीच असतो आणि अतिरिक्त सुरक्षा उपायांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी शुल्क आकारलं जातं. जे या वस्तू विकताना तुम्हाला मिळत नाही.
गोल्ड ईटीएफ
गोल्ड ईटीएफ हे एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) आहेत ज्यांचं उद्दिष्ट देशांतर्गत भौतिक सोन्याच्या किंमतीचा मागोवा घेणं हा आहे. हा गुंतवणूकीचा पॅसिव पर्याय आहे, जे सोन्याच्या किमतीवर आधारित आहेत आणि सोन्याच्या सराफामध्ये गुंतवणूक करतात. एक गोल्ड ईटीएफ युनिट एक ग्रॅम सोन्याइतके असते आणि त्यात उच्च शुद्धतेचं भौतिक सोनं असतं. गोल्ड ईटीएफ कंपनीच्या स्टॉकप्रमाणे एक्सचेंजेसवर सूचीबद्ध आणि व्यापार केले जातात. ज्यामध्ये तुम्ही ५०० रुपये मोजून सोने खरेदी करू शकता.
गोल्ड म्युच्युअल फंड
गोल्ड फंड म्युच्युअल फंडांच्या श्रेणीचे प्रतिनिधित्व करतात ज्यात सोन्याच्या साठ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक समाविष्ट असते. हे फंड सामान्यत: सोन्याचे उत्पादन आणि वितरण करणार्या, भौतिक सोनच्या होल्डिंग्स आणि खाण कंपन्यांच्या शेअर्सना गुंतवणुकीचे वाटप करतात. तुम्ही या फंडांमध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता.
हे गोल्ड-केंद्रित म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड आहेत आणि संबंधित गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ETF) कामगिरीवरून त्यांची युनिट मूल्ये प्राप्त होतात. फंडाचं मूल्य भौतिक सोन्याच्या सध्याच्या किमतीशी जवळून जोडलेलं असल्यानं, सोन्याच्या बाजारभावातील बदलांमुळे त्याच्या कामगिरीवर थेट परिणाम होतो.
गोल्ड फंड
इन्वेस्को इंडिया गोल्ड फंड- डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ), एसबीआय गोल्ड फंड- डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ), एचडीएफसी गोल्ड फंड- डायरेक्ट प्लॅन, कोटक गोल्ड फंड- डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ), अॅक्सिस गोल्ड फंड- डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ) आणि निप्पॉन इंडिया गोल्ड सेव्हिंग फंड- डायरेक्ट प्लॅन (ग्रोथ)
सॉवरेन गोल्ड बॉन्ड
सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGBs) हे सोन्याच्या ग्रॅममधील डिनॉमिनेटेड सरकारी सिक्युरिटीज आहेत, जे भौतिक सोन्याच्या मालकीचा पर्याय म्हणून काम करतात. हे बॉन्ड भारत सरकारच्या वतीनं भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात आणि गुंतवणूकदार रोखीने इश्यूची किंमत देतात आणि मुदतपूर्तीवर रोख नफा मिळवतात.