Join us

१५ वर्षांसाठी गुंतवणूक करायचीये? सुकन्या समृद्धी की PPF, कुठे मिळेल जास्त फायदा; कुठे मिळेल अधिक व्याज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 3:56 PM

Government Investment Schemes : पैसे गुंतवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड जोडू शकता. पाहूया कोणती स्कीम आहे फायद्याची

Government Investment Schemes : पैसे गुंतवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड जोडू शकता. त्यापैकीच एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना. दोन्ही योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठा निधी गोळा करू शकता. या योजनांमध्ये अर्ज करायचा असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करू शकता.

दोन्ही प्लॅनमध्ये कोणताही रिस्क नाही. ठराविक कालावधीनंतर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. दोन्ही योजनांमध्ये मिळणारे व्याज केंद्र सरकार ठरवते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के दरानं व्याज मिळतं. तर सुकन्या समृद्धी योजनेवर (SSY) वार्षिक ८.२ टक्के दरानं व्याज मिळतं. अशा परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवून तुम्ही अधिक नफा कमावू शकता.

कोण करू शकतो अर्ज?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीपेक्षा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून अधिक परतावा मिळू शकतो, परंतु लक्षात ठेवा की सुकन्या समृद्धी योजनेत केवळ १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठीच अर्ज करता येतो. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ही योजना मॅच्युअर होते. त्याचबरोबर कोणताही भारतीय नागरिक पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करू शकतो.

तुम्हाला किती परतावा मिळेल?

जर तुम्ही दोन्ही योजनांमध्ये १ वर्षात एकूण १.५० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर १५ वर्षात तुम्ही एकूण २२,५०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. एसएसवायमध्ये १५ वर्षांनंतर तुम्हाला ८.२ टक्के व्याजदरानं ६९,८०,१०० रुपये मिळतील, ज्यात ४७ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज असेल. तर पीपीएफमध्ये १५ वर्षानंतर तुम्हाला ४०,६८,२०९ रुपये मिळतील, ज्यात १८ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज असेल.

 

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकसरकार