Join us

मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे हवेत? 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, १५ वर्षांत मिळेल मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 2:58 PM

मूल जन्माला येताच आपल्याला त्याच्या भविष्याची काळजी वाटू लागते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही.

मूल जन्माला येताच आपल्याला त्याच्या भविष्याची काळजी वाटू लागते. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्माबरोबरच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही १५ वर्षांत मोठी रक्कम जोडू शकता आणि तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकता. येथे असे दोन गुंतवणुकीचे पर्याय सांगत आहोत जिथे तुम्ही दरमहा ५००० रुपये देखील गुंतवलेत तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल आणि काही वर्षांत तुमच्याकडे लाखो रुपये जमा होतील.पीपीएफसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF) ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये कोणताही भारतीय सहजपणे गुंतवणूक करू शकतो. पीपीएफमध्ये दरवर्षी किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला सरकारी हमी मिळते, म्हणजेच तुम्ही कितीही रक्कम गुंतवत असाल, त्यावर तुम्हाला हमी परतावा मिळेल. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे.अशा स्थितीत तुम्ही दरमहा ५ हजार रुपये देखील गुंतवले तर वर्षभरात तुम्ही ६० हजार रुपये गुंतवले जातील. पीपीएफ ही १५ वर्षांची योजना आहे. अशा स्थितीत १५ वर्षांत एकूण ९ लाख रुपयांची गुंतवणूक होईल. ७.१ टक्के दराने तुम्हाला ७,२७,२८४ रुपये फक्त पीपीएफवर व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला गुंतवलेल्या ९ लाख रुपयांची रक्कम आणि व्याजासह एकूण १६,२७,२८४ रुपये मिळतील. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी वापरू शकता.एसआयपीजर तुम्ही या बाबतीत थोडी जोखीम पत्करू शकत असाल, तर तुम्ही एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. हे मार्केट लिंक्ड असल्यानं, त्यात परताव्याची हमी नाही, परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास एसायपीद्वारे सरासरी १२ टक्के परतावा मिळू शकतो. तुम्ही एसआयपी पर्याय निवडला तरीही तुम्हाला दरमहा फक्त ५ हजार रुपये गुंतवावे लागतील.परंतु जर आपण सरासरी १२ टक्क्यांचा परतावा मोजला तर १५ वर्षात ९ लाख रुपयांची गुंतवणूक होईल आणि त्यावर १६,२२,८८० रुपयांचं व्याज मिळेल. १५ वर्षांनंतर, तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजासह तुम्हाला एकूण २५,२२,८८० रुपये मिळतील, जे तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा