Join us  

५० व्या वर्षीच रिटायर व्हायचंय? FIRE मॉडेलचा करा अवलंब; भासणार नाही पैशांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 9:45 AM

तुम्हालाही लवकर निवृत्त होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही फायर मॉडेल नुसार तुमच्या सेवानिवृत्तीचं नियोजन करू शकता.

निवृत्तीचं नाव ऐकताच तुमच्या डोक्यात ६० वर्ष वगैरे अशा वयाचा विचार येत असेल. पण आजकाल निवृत्ती घेण्यासाठी त्या वयाचं असणं आवश्यक नाही. आजकाल बर्‍याच लोकांना आपण लवकर निवृत्त व्हावं असं वाटत असतं. तुम्हालाही लवकर निवृत्त होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही फायर मॉडेल नुसार तुमच्या सेवानिवृत्तीचं नियोजन करू शकता.

‘फायर मॉडेल’ म्हणजे फायनान्शिअल इंडिपेंडंट, रिटायर अर्ली. (Financial Independence, Retire Early). या मॉडेल अंतर्गत, तुम्ही तुमचं निवृत्तीचं वय स्वतः ठरवू शकता. जर तुम्ही हे मॉडेल स्वीकारलं तर तुम्हाला एक खास रणनीती बनवावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या पगाराच्या ७० टक्के रक्कम बचतीमध्ये टाकावी लागेल. हे मॉडेल १९९२ मध्ये विकी रॉबिन आणि जो डोमिंग्वेझ यांच्या युवर मनी ऑर युवर लाइफ या पुस्तकापासून सुरू झालं.आपला FIRE नंबर कॅलक्युलेट कराफायर नंबर माहित असण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला कोणत्या वयात निवृत्त व्हायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमचा पगार, तुमचा खर्च, तुमची जीवनशैली आणि निवृत्तीनंतरची जीवनशैली लक्षात घेऊन गणना करावी लागेल. जर तुम्ही स्वतः कॅलक्युलेशन करू शकत नसाल तर तुम्ही फायनान्शिअल प्लानरची मदत घेऊ शकता.बचत वाढवा, खर्च कमीया मॉडेल अंतर्गत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बचत जास्तीत जास्त असावी. या अंतर्गत, तुम्हाला केवळ तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार नाही, तर ते कमी करण्याचाही प्रयत्न करावा लागेल.उत्पन्न वाढवाजर तुम्ही मोठ्या पगाराची नोकरी करत असाल तर, तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. अन्यथा तुम्हाला तुमचा पगार वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल.दरवर्षी बचत वाढवातुमचा पगार वर्षाला वाढत जाईल. अशा परिस्थितीत तुमचा खर्चदेखील दरवर्षी वाढेल. परंतु तुम्हाला तुमची बचत वाढवावी लागेल. 

टॅग्स :गुंतवणूकपैसा