Join us

Sukanya Samriddhi Yojana मध्ये किती रक्कम आहे जमा, हे पाहायचंय? सोपी आहे प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:08 AM

सुकन्या समृद्धी योजना हे मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल आहे.

सुकन्या समृद्धी योजना हे मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ही योजना आर्थिक सुरक्षितता आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि ती गुंतवणूक म्हणूनही काम करते. या योजनेत पैसे जमा केल्यानंतर, एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे "माझ्या मुलीच्या खात्यात किती पैसे जमा झाले?" या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे आणि ते कसं पाहता येईल हे आपण जाणून घेऊ.कसं चेक करू शकता रक्कम?सुकन्या समृद्धी योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. 'Sukanya Samriddhi Yojana Official Website.' या नावानं ते तुम्ही शोधू शकता.लाँग इन करावेबसाइटवर गेल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल.खातं निवडालॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमचं सुकन्या समृद्धी योजना खातं निवडावं लागेल.मिळेल सर्व माहितीएकदा तुम्ही तुमच्या खात्यात आल्यावर, तुम्ही तुमच्या खात्याबद्दल सर्व महत्त्वाची माहिती मिळवू शकता, जसx की तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहेत आणि शेवटची जमा तारीख.सुकन्या समृद्धी योजनेद्वारे, तुम्ही तुमच्या मुलीसाठी आर्थिक सुरक्षाच नाही तर तिचं शिक्षण आणि तिचे भविष्य उज्ज्वल करू शकता. वरील सर्व गोष्टींच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्याची स्थिती सहजपणे तपासण्यास सक्षम असाल.

टॅग्स :गुंतवणूक