Lokmat Money >गुंतवणूक > महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी? 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी? 

या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:59 PM2023-11-25T12:59:24+5:302023-11-25T13:00:16+5:30

या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

What are the conditions for premature closure of Mahila Samman Savings Certificate account how much penalty interest rates scheme details investment | महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी? 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या अकाऊंटच्या प्रीमॅच्युअर क्लोजरच्या काय आहेत अटी, किती पेनल्टी? 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate-MSSC) योजना भारत सरकारद्वारे महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं चालवली जाते. या योजनेत महिला जास्तीत जास्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. ही एक डिपॉझिट स्कीम आहे ज्यामध्ये ७.५ टक्के दरानं व्याज मिळतं.

ही योजना दोन वर्षांनी मॅच्युअर होते, म्हणजे जर तुम्ही त्यात दोन लाख रुपये जमा केले तर तुम्हाला ते दोन वर्षांनी ते व्याजासह मिळतील. पण जर एखाद्या महिलेला दोन वर्षापूर्वी ही रक्कम हवी असेल तर ती प्री-मॅच्युअर क्लोजर (MSSC Premature Closure Rules) करता येईल का? जर हे करू शकत असाल तर याचे काय नियम आहेत? जाणून घेऊ याबद्दल अधिक.

कधी काढता येतात पैसे?
नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला आंशिक पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही जमा केलेल्या रकमेपैकी ४० टक्के रक्कम काढू शकता. म्हणजेच तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.

काय आहेत नियम?
जर तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करायचे असेल आणि संपूर्ण रक्कम काढायची असेल, तर तुम्हाला ही परवानगी विशेष परिस्थितींमध्येच मिळते.

 

  • खातेदाराच्या मृत्यू झाल्यास
  • खातेधारकाला गंभीर आजार झाल्यास, पालकाचा मृत्यू इ. स्थितीत. मात्र यासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील.
  • कोणतेही कारण नसताना खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर. परंतु या स्थितीत तुमचा व्याजदर २ टक्क्यांनी कमी होतो. म्हणजेच तुम्हाला ७.५ टक्क्यांऐवजी ५.५ टक्के दरानं व्याज मिळेल.


कोण उघडू शकतं हे खातं?
MSSC योजनेचं उद्दिष्ट फक्त महिलांना अधिक व्याज देऊन बचत करून त्यांचे पैसे वाढविण्यात मदत करणं आहे. कोणत्याही वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीचे पालक त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकतात. सध्या त्यावर ७.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे, परंतु सरकारनं यादरम्यान व्याजदरात बदल केला तरी आधीच उघडलेल्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजेच खाते उघडल्याच्या तारखेपासून कोणताही व्याजदर ठरवला गेला असला तरी तो मुदतपूर्तीपर्यंत लागू राहणार आहे.

Web Title: What are the conditions for premature closure of Mahila Samman Savings Certificate account how much penalty interest rates scheme details investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.