Lokmat Money >गुंतवणूक > काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल

काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल

Expensive Houses In Mumbai : ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. यात 4 BHK आणि 5 BHK युनिट्सह डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊस असलेले 2 टॉवर आहेत. यातील एका घराच्या किमतीत संपूर्ण कंपनी उभी राहू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:47 AM2024-09-13T10:47:51+5:302024-09-13T10:53:18+5:30

Expensive Houses In Mumbai : ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. यात 4 BHK आणि 5 BHK युनिट्सह डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊस असलेले 2 टॉवर आहेत. यातील एका घराच्या किमतीत संपूर्ण कंपनी उभी राहू शकते.

what do you say The company will stand at the price of a house next door to Bachchan and Shahid Kapoor; Seeing the number will make you dizzy | काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल

काय सांगता? बच्चन आणि शाहिद कपूरच्या शेजारील घराच्या किमतीत कंपनी उभी राहील; आकडा पाहून भोवळ येईल

Expensive Houses In Mumbai : शहरात घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. विशेषकरुन मुंबईसारख्या मेट्रो सिटीत घर घेणे सर्वसामान्यांच्या कधीच आवाक्याबाहेर गेलं आहे. मात्र, या किमतीलाही काही मर्यात राहिली नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. मुंबईतील वरळी भागात ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. यात एका अपार्टमेंटची किंमत वाचून अनेकांना भोवळ येण्याची शक्यता आहे. कारण, या किमतीत एखादी स्मॉमकॅप कंपनीच उभी राहू शकते.

फर्निचर फिटिंग आणि ॲक्सेसरीज फर्म एब्को प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रमोटर अ‍ॅशले नागपाल आणि त्यांची पत्नी बियान्का नागपाल यांनी मुंबईच्या वरळी भागात तब्बल 115 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. Zapky च्या मते, अपार्टमेंट ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रकल्पाच्या 60 व्या मजल्यावर आहे. हे घर बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन आणि शाहिद कपूर यांच्या घराशेजारी असल्याचेही माहिती समोर आली आहे.

दीड लाखांना एक स्क्वेअर फूट
7,139 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे अपार्टमेंट रु. 1.60 लाख प्रति स्क्वेअर फूट दराने विकले गेले. 28 ऑगस्ट 2024 रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली होती. या अपार्टमेंटमध्ये 5 कार पार्किंग स्पेसचा समावेश आहे. या दाम्पत्याने मालमत्तेसाठी 4.55 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क म्हणून भरले. म्हणजे फक्त स्टँप ड्युटीच्या किमतीत एखादं अलिशान घर येऊ शकते.

कसा आहे प्रकल्प?
मुंबईत वरळीतील पॉश भागात ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट हा एक लक्झरी निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात 4 BHK आणि 5 BHK युनिट्स सोबत डुप्लेक्स अपार्टमेंट आणि पेंटहाऊस असलेले 2 टॉवर आहेत. या प्रकल्पाला 2022 मध्ये मंजुरी मिळाली आहे. सी फेसीगंसाठी हा प्रकल्प प्रसिद्ध आहे. टॉवरची उंची 360 मीटर असून यातील सर्व प्लॅट पश्चिम दिशेला आहे.

कोण आहेत अ‍ॅशले नागपाल?
लिंक्डइन प्रोफाइलनुसार, अ‍ॅशले नागपाल जून 1986 पासून ऍब्को प्रायव्हेट लिमिटेडमध्ये टेक्निकल डायरेक्टक म्हणून कार्यरत आहेत. 1981 मध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आणि 1979 मध्ये सेंट पॉल स्कूल, दार्जिलिंग येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर बंगलोर विद्यापीठातून मॅकेनिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. 

शेजारी राहतात दिग्गज लोक
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये अनेक बॉलिवूड स्टार आणि दिग्गज लोक राहतात. बॉलीवूड अभिनेते शाहिद कपूर आणि अभिषेक बच्चन, डीमार्टचे राधाकृष्ण दमानी आणि एव्हरेस्ट मसाला ग्रुपचे प्रवर्तक वाडीलाल भाई शाह यांचे अपार्टमेंट ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये आहेत. या वर्षी मे महिन्यात शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी या प्रोजेक्टमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांमध्ये 5,395 स्क्वेअर फूटाचे अपार्टमेंट खरेदी केले होते.
 

Web Title: what do you say The company will stand at the price of a house next door to Bachchan and Shahid Kapoor; Seeing the number will make you dizzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.