Digital Gold Investment: देशातील मोठ्या संख्येने लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. सण असो किंवा लग्नाचा हंगाम, भारतात मोठ्या प्रमाणात लोक सोनं खरेदी करतात. पण हळूहळू गुंतवणुकीची पद्धत बदलत आहे. सध्या लोकांमध्ये डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. डिजिटल लोन केवळ सुरक्षितच नाही तर त्याची खरेदी-विक्री ही फिजिकल लोनपेक्षाही सोपी प्रक्रिया आहे.
काय आहे डिजिटल गोल्ड?डिजिटल सोनं हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही ईटीएफ, गोल्ड सेव्हिंग फंड यांसारख्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोनं खरेदी करू शकता. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणं किमान १ रुपयापासून सुरू केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही बाजारभाव पाहता तेव्हा तुम्ही खरेदी आणि विक्री करू शकता. विशेषतः भारतातील ३ कंपन्या MMTC-PAMP India Pvt. Ltd, Augmont Gold Ltd आणि Digital Gold India Pvt Ltd त्यांच्या सेफ गोल्ड ब्रँड अंतर्गत डिजिटल सोनं ऑफर करतात. एअरटेल पेमेंट्स बँकदेखील (Airtel Payments Bank) सेफ गोल्डच्या भागीदारीत डिजिगोल्ड (DigiGold) ऑफर करते.कोण खरेदी करू शकतं?भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती डिजिटल सोनं खरेदी करू शकते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, डिजिटल सोनं खरेदी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे सेव्हिंग अकाऊंट किंवा करंट अकाऊंट असणं आवश्यक आहे. भारतात डिजिटल गोल्ड एक अल्पवयीन अकाऊंट होल्डर आणि एनआरओ खाते नसलेला एनआरआय ग्राहक खरेदी करू शकत नाही.का करावी गुंतवणूक?
- यामध्ये तुम्ही अगदी लहान रकमेपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. ग्राहक गरजेनुसार डिजिटल सोनं विकू शकतो.
- डिजिटल सोन्याचे फिजिकल सोन्यात रूपांतर करण्याचा पर्याय देखील आहे. हे सोन्याची नाणी, बार किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं.
- विक्रेत्याद्वारे डिजिटल सोनं विमाधारक आणि सुरक्षित व्हॉल्टमध्ये साठवलं जातं. यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही.
- जर तुमच्याकडे डिजिटल गोल्ड असेल, तर तुम्ही ऑनलाइन लोनसाठी ते कोलॅटरल म्हणून असेट्सच्या रुपात वापरू शकता.
- डिजिटल सोन्यात गुंतवणुकीचा फायदा असाही आहे की तुम्हाला सोन्याच्या किमतींबाबत त्वरित अपडेट मिळतात. रिअल-टाइम मार्केट अपडेटच्या आधारे ग्राहक सोनं खरेदी किंवा विक्री करू शकतो.