Lokmat Money >गुंतवणूक > सर्वाधिक गुंतवणूक कशात?; एसआयपी गुंतवणुकीचा जुलै महिन्यात १५,२४५ कोटी रुपयांचा विक्रम

सर्वाधिक गुंतवणूक कशात?; एसआयपी गुंतवणुकीचा जुलै महिन्यात १५,२४५ कोटी रुपयांचा विक्रम

४१ टक्के लोक डेट फंडात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:07 AM2023-09-05T08:07:10+5:302023-09-05T08:07:20+5:30

४१ टक्के लोक डेट फंडात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे.

What is most invested in?; SIP investments hit a record of Rs 15,245 crore in July | सर्वाधिक गुंतवणूक कशात?; एसआयपी गुंतवणुकीचा जुलै महिन्यात १५,२४५ कोटी रुपयांचा विक्रम

सर्वाधिक गुंतवणूक कशात?; एसआयपी गुंतवणुकीचा जुलै महिन्यात १५,२४५ कोटी रुपयांचा विक्रम

नवी दिल्ली : सर्वाधिक परतावा मिळण्याच्या शक्यतेमुळे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा अधिक कल इलेक्ट्रानिक ट्रेडेड फंडांकडेच (ईटीएफ) असतो; परंतु बाजारात पैसे लावणाऱ्या ८९ किरकोळ गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडात पैसे गुंतवल्याचे ‘एम्फी’ने केलेल्या पाहणी समोर आले आहे, तर ईटीएफमध्ये केवळ १० टक्के जणांनी पैसे लावल्याचे दिसून आले आहे. 

१२ टक्के गुंतवणूकदार शाॅर्ट टर्म डेट फंड म्हणजे मनी मार्केट फंडात, तर ४१ टक्के लोक डेट फंडात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे. याउलट ९० टक्के संस्थागत म्हणजेच मोठे गुंतवणूकदार मनी मार्केट फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचे जीवन आदी कारणांसाठी किरकोळ गुंतवणूकदार दीर्घ कालखंडासाठी गुंतवणूक करीत असतात. अधिक परताव्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडलेला असतो.

लोकप्रिय पर्याय 

किरकोळ गुंतवणूकदार दर महिन्याला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत असतात. जुलैमध्ये याद्वारे १५,२४५ कोटी इतकी विक्रमी गुंतवणूक झाली. या खात्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ८९.८ टक्के इतकी वाढ झाली. 

एसआयपीचा लेखाजोखा 
    जुलै २०२२    जुलै २०२३    बदल 
मासिक एसआयपी    १२,१४०    १५,२४५    २५.६%
एयूएम    ६,०९,०००    ८,३२,०००    ३६.६%
एकूण खाती    ५.६३ कोटी    ६.८१ कोटी    २१.२%
नवीन खाती    १७.४ लाख    ३३.१ लाख    ८९.९%
बंद झालेली खाती    १०.४ लाख    १७.९ लाख    ७२.६ %
    (एसआयपी आणि एयूएमची आकडेवारी कोटी रुपयांमध्ये)

Web Title: What is most invested in?; SIP investments hit a record of Rs 15,245 crore in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.