जेव्हा जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा बहुतेक लोकांना आपण बचत केलेल्या पैशांचा वापर करावा असं वाटत असतं. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की कर्जामुळे समस्या उद्भवू शकतात, म्हणून ते टाळलंही पाहिजे. जर तुम्हीही पैशांची गरज भागवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी तोडण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. चला तर मग जाणून घेऊया एफडीवर कधी कर्ज घ्यावं आणि कधी गरज भासल्यास एफडी तोडावी.
समजा तुमच्याकडे २ वर्षांची एफडी आहे, ज्यावर तुम्हाला ७% व्याज मिळत आहे, असं होऊ शकतं बँक तुम्हाला १ वर्षाच्या एफडीवर जवळपास ६.५% व्याज देऊ शकते. आता पैशांची गरज असताना एफडी तोडल्यास मुदतीपूर्वी एफडी तोडल्यास जवळपास १ टक्के दंडही भरावा लागणार आहे. अशावेळी तुम्हाला त्यावर फक्त ५.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.
कधी होईल कर्ज घेण्यानं फायदा?
जर तुम्ही एफडीवर लोन घेत असाल तर ते नॉर्मल पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असेल. जर तुम्हाला ७% व्याज मिळत असेल तर तुम्हाला एफडीवर ८.५-९% व्याजानं कर्ज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही केलेली बचत सुरक्षित राहील आणि मॅच्युरिटीपर्यंत चालू राहील. म्हणजे तुमच्यावर कर्जाचा बोजा पडणार असला तरी तुमच्याकडे बचतही असेल.
... तर विचार करू नका
समजा तुम्हाला एफडीच्या २० ते ३० टक्के रक्कम हवी असेल तर तुम्ही एफडी अजिबात तोडू नये. दुसरीकडे जर तुमची एफडी ६ महिने किंवा वर्षभरापेक्षा जास्त झाली असेल तर त्याकडे अजिबात पाहू नका. जर तुम्हाला एफडीची ८०-९०% रक्कम हवी असेल आणि तुमची एफडी मॅच्युअरही होणार असेल तरी एफडी तोडण्याचा प्रयत्न करू नका. अशावेळी इतर कुठून तरी काही पैशांची व्यवस्था करा अन्यथा तुम्हाला एफडीवर ८० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळूनच जाईल.
कधी एफडी तोडणं फायद्याचं?
जर तुम्ही फक्त काही महिन्यांसाठी एफडी केली असेल तर तुम्ही लोनऐवजी एफडी तोडू शकता. खूप जास्त पैशांची गरज असेल तरच हे करा. जर तुम्हाला एफडीच्या रकमेच्या फक्त २०-३०% रक्कम हवी असेल तर एफडी तोडण्याऐवजी कर्ज घ्या. जेव्हा आपल्याला कमीतकमी ७०% रकमेची आवश्यकता असेल तेव्हाच एफडी तोडण्याचा विचार करा, तेही जेव्हा ती सुरू होऊन काही महिने झाले असतील तर करण्याचा विचार करा.