Lokmat Money >गुंतवणूक > ५०/३०/२० फॉर्म्युल्याने काय होणार?; भविष्यात नक्कीच होईल आर्थिक फायदा

५०/३०/२० फॉर्म्युल्याने काय होणार?; भविष्यात नक्कीच होईल आर्थिक फायदा

या नियमाचे पालन करून तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा दोन्ही पूर्ण करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 07:26 AM2024-04-21T07:26:52+5:302024-04-21T07:27:39+5:30

या नियमाचे पालन करून तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा दोन्ही पूर्ण करू शकता.

What will happen to the 50/30/20 formula?; There will definitely be financial benefits in the future | ५०/३०/२० फॉर्म्युल्याने काय होणार?; भविष्यात नक्कीच होईल आर्थिक फायदा

५०/३०/२० फॉर्म्युल्याने काय होणार?; भविष्यात नक्कीच होईल आर्थिक फायदा

चंद्रकांत दडस, उपसंपादक

आपल्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली असावी आणि सर्व गरजा कोणत्याही अडचणींशिवाय वेळेत पूर्ण व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटते. याचवेळी आपल्या भविष्यासाठी काही प्रमाणात बचत व्हावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठी ५०/३०/२० हा फॉर्म्युला तुमच्या मदतीला येऊ शकतो. 

काय आहे नेमका फॉर्म्युला? 
यामध्ये तुमच्याकडे जे पैसे आहेत ते तीन भागात विभागून घ्या. ज्या गरजा खूप महत्त्वाच्या आहेत त्यावर खर्च करण्यासाठी ५० टक्के रक्कम ठेवा. यामध्ये रेशन, वीज बिल, मुलांचे शिक्षण, आदी आणि इतर अनेक खर्चांचा समावेश आहे. प्रवास आणि खरेदी या आपल्या आनंद तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी ३० टक्के रक्कम खर्च करा. २० टक्के रक्कम बचत खात्यात टाका.

उदाहरणाने समजून घ्या
समजा तुम्ही दरमहा ५०,००० रुपये कमावता. अशा परिस्थितीत, ५०/३०/२० च्या नियमानुसार, ५० टक्के म्हणजे २५,००० रुपये घरगुती गरजांसाठी खर्च करण्यासाठी ठेवा. तुमचा आनंद पूर्ण करण्यासाठी तुम्ही ३० टक्के म्हणजे १५,००० रुपये खर्च करू शकता आणि २० टक्के म्हणजे १०,००० रुपये वाचवू शकता.

५०%    अत्यावश्यक खर्चासाठी
३०%    आनंदासाठी
२०%    बचत

फायदे काय आहेत ? 
पैशांचे नियोजन करता येईल.
तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकता.
यामुळे सुरक्षित भविष्याचा मार्ग खुला होतो.
कोणतेही अनावश्यक खर्च होत नाहीत.
या नियमाचे पालन करून तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा दोन्ही पूर्ण करू शकता.

Web Title: What will happen to the 50/30/20 formula?; There will definitely be financial benefits in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.