देशातील एडटेक उद्योगात मोठा बदल घडवणाऱ्या Byju's या कंपनीचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. एकानंतर एक कंपनीचे सहकारी साथ सोडत आहेत. आता बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीतील सर्वात मोठे गुंतवणूकदार प्रोसस (Prosus) ने यातून बाहेर पडण्याचा मार्ग निर्णय घेतला आहे. बोर्डातून बाहेर पडल्यानंतर इन्व्हेस्टमेंट फर्म प्रोससने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रोससने सांगितले बाहेर पडण्याचे कारणByju's सोडल्यानंतर Prosus ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, edtech कंपनी Byju's च्या कार्यकारी नेतृत्वाने सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. धोरणात्मक, ऑपरेशनल, कायदेशीर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रकरणांशी संबंधित सल्ले आणि शिफारशींकडे दुर्लक्ष केले गेले. बायजूसाठी अडचणी निर्माण होण्यास तेव्हा सुरुवात झाली, जेव्हा पीक XV पार्टनर्सच्या तीन बोर्ड सदस्यांनी गेल्या महिन्यात कंपनीच्या बोर्डाचा राजीनामा दिला.
2018 मध्ये पहिली गुंतवणूक केलीप्रोससच्या निवेदनात असे म्हटले की, 2018 मध्ये पहिल्या गुंतवणुकीनंतर बायजूच्या व्यवसायात बरीच वाढ झाली. परंतु कालांतराने त्यांचे अहवाल आणि प्रशासन संरचना कंपनीच्या प्रमाणानुसार पुरेशी विकसित होऊ शकली नाही. बोर्डाच्या प्रतिनिधींनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीचे हे पहिले अधिकृत निवेदन आहे. Prosus च्या मते BYJU च्या संचालक मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय, कंपनी आणि तिच्या भागधारकांच्या दीर्घकालीन हितासाठी आपली जबाबदारी पार पाडण्यात अक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घेण्यात आला.